मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी वडिलास जामीन मंजूर
करमाळा प्रतिनिधी – केडगाव ता. करमाळा येथील मयत बाळासाहेब अर्जुन बोराडे यांना लोखंडी हत्याराने डोक्यास मारहाण करून खून केल्याचा आरोप असलेल्या मयताचे वडिल अर्जुन दगडु बोराडे यांस बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. व्ही.के.मांडे साहेब यांनी अटी व शर्तीसह दिनांक.5/2/2025 रोजी जामीन मंजूर केला.
दिनांक – 30/11/2024 रोजी केडगांव येथील मयत बाळासाहेब अर्जुन बोराडे हा दारू पिऊन करित असलेल्या त्रासाला कंटाळुन वडील अर्जुन दगडू बोराडे यांनी लोखंडी हत्याराने मयत इसमाचे डोक्यास मारहाण करून खून केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
गुलमोहरवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील छोट्या चिमुकल्यांचा मोठा कलाविष्कार
त्यानंतर आरोपीने बार्शी सत्र न्यायालयात जामीनासाठी ॲड. आय. के. शेख, बार्शी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला होता.त्यानंतर आरोपीच्या वतीने केलेला महत्वपूर्ण युक्तीवाद ग्राहय धरून न्यायाधिशांनी आरोपीस जामीन मंजूर केला. आरोपीतर्फे ॲड. आय. के. शेख बार्शी,ॲड. सागर फरतडे, ॲड. मनिषा घाडगे यांनी काम पाहिले.
