करमाळासोलापूर जिल्हा

मृत्यूनंतरही संपेनात हाल : उजनी पुनर्वशीत गावांची स्थिती

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मृत्यूनंतरही संपेनात हाल : उजनी पुनर्वशीत गावांची स्थिती

केत्तूर (अभय माने) उजवी पुनर्वशीत करमाळा तालुक्यातील केत्तूर ग्रामस्थांच्या स्मशानभूमीचा प्रश्न सुटता सुटत नव्हता अखेर या ठिकाणी लोकवर्गणी करून ग्रामस्थांनी उजनी जलाशयासाठी स्मशानभूमी तयार केली त्याला पुढे शासनाकडून काम सुरू करण्यात आले.व मृतदेहासाठी पत्राशेट उभारण्यात आले परंतु सुख सुविधा मात्र शून्यच स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही खराब असल्याने पावसाळ्याच्या दिवसात मृतदेह चौघांच्या खांद्यावर ( ताटीवर) नेण्याऐवजी चारचाकी वाहनातून न्यावा लागत आहे . या ठिकाणी पावसाळ्याच्या दिवसात अंत्यविधी करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना निवारा नसल्याने नाहक त्रास सोसावा लागत आहे.

असाच प्रकार समोर आला असून,येथील रहिवासी सुनील माने यांचे मंगळवार (ता.24) रोजी निधन झाले त्यांचा भर पावसात रात्री दहा वाजता मोबाईल बॅटरीच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडवा लागला. तर बुधवार (ता.25) रोजी मंदोदरी ठोंबरे यांचा अंत्यविधी होता यावेळीही पाऊस सुरू असल्याने स्मशानभूमीमध्ये निवाऱ्याची कसल्याही प्रकारची सोय नसल्याने ग्रामस्थांना तसेच नातेवाईकांना भर पावसात थांबावे लागले. रात्रीच्यावेळी दिवाबत्तीची सोय नसल्याने अंधाराचा सामना करावा लागत आहे त्यानंतर नेमिनाथ होरणे यांचा अंत्यविधी तर नाईलाजास्तव शेजारी असणाऱ्या पोमलवाडी गावातील स्मशानभूमीत करावा लागला. या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.

हेही वाचा – कावळवाडी गावचे माजी सरपंच अनिल शेजाळ यांच्या मातोश्रींचे निधन

उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाच्या 24 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

उजनी पुनर्वसन होऊन 50 वर्षाचा कालावधी लोटला तरी पुनर्वशीत गावठाणांना प्रशासनाकडून मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत मिळालेल्या नाहीत हे मोठे दुर्भाग्य आहे.आणि त्याचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत आहे. शासन, प्रशासन,याबरोबरच आपणही विकासाच्या कितीही गप्पा मारत असतो तरी आपण विकासापासून कोसो दूर आहोत हेच यावरून प्रकर्षाने दिसून येते.

litsbros