ताज्या घडामोडीदेश/विदेशपुणेमहाराष्ट्रराजकारण

मुलाखतीत राहुल गांधी विचारतात ‘राजनीती में आप किसे आदर्श मानते हो?’ आणि राजीव सातव उत्तर देतात, ‘शरद पवार साहब’ वाचा त्या संपूर्ण मुलाखतीची गोष्ट

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राहुल गांधी विचारतात ‘राजनीती में आप किसे आदर्श मानते हो?’ आणि राजीव सातव उत्तर देतात, ‘शरद पवार साहब’ वाचा त्या संपूर्ण मुलाखतीची गोष्ट

एक इमानदार युवा नेता मित्र राजीव सातव

” राजनिती मे आप किसको आदर्श मानते हो ” असा सवाल काॅग्रेसचे नेते राहुल गांधी विचारतात… अन पुढं बसलेला तीशीच्या वयातला युवा चेहरा स्पष्ट पणे म्हणतो की..” राजनिती मे मै शरद पवार साहब को अपना आदर्श मानता हूं..”
गांधी घराण्याच्या शक्तीशाली वारसाच्या समोर असं उत्तर देणारा हा युवक म्हणजेच राजीव सातव…!

राहुल गांधी यानी देशभरात मुलाखत घेवून युवक प्रदेशाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू केला होता. स्वतः राहूल गांधी इच्छुकांच्या मुलाखती घेणार होते. त्याच पध्दतीने मुंबई काॅग्रेसच्या कार्यालयात राहुल गाधीनी महाराष्ट्र युवक काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मुलाखती सुरू केल्या. राजयभरातून अनेक युवा कार्यकर्त्यांनी मुलाखती दिल्या. त्यात राजीव सातव यांची मुलाखत राहूलजीना भावली. राजीव सातव एकमेव कार्यकर्ते होते की त्यांनी लॅपटाॅप हातात घेवून राहुलजींच्या समोर सादरीकरण केले होते. या मुलाखतीचा फंडा फारच वेगळा होता. समोरासमोर फक्त दोन खुर्च्या … त्या हाॅल मधे इतर कोणीही नेता नाही. फक्त राहूल गांधी अन समोर मुलाखत देणारा युवा कार्यकर्ता….

सर्व मुलाखतदार कार्यकर्त्यांनी आपापले बायोडाटा अन आंदोलनाच्या बातम्या यांची छापील माहिती आणली होती. फोटोंचा अल्बम अन ही कात्रणांची फाईल दाखवून राहूलजींना इम्प्रेस करण्याचा सगळेच प्रयत्न करत होते. पण राजीव सातव यांनी या जुनाट पध्दतीला फाटा देत फक्त लॅपटाॅप सोबत नेला. हाय हॅलो झाल्याबरोबर राजीव म्हणाले मला एक टीपाॅय हवा. राहुलजीनी विचारले कशासाठी हवाय.. मला लॅपटाॅप वर सादरीकरणं दाखवायचेय… पहिलाच उमेदवार होता जो लॅपटाॅप वर सादरीकरण करणार होता.

मुलाखत रंगली. अत्यंत सहजता अन सभ्यता राजीव सातव यांच्या व्यक्तीमत्वात होती. राहुलजींनी या युवा कार्यकर्त्यामधली हीच सहजता सभ्यता पारखली. बाहेर आम्ही मिडीयावाले उभे होतो. राजीव सातव अन माझी तशी जुजबी ओळख. बाहेर प्रेस क्लबच्या समोर बोलताना मी त्यांना कशी झाली मुलाखत याबाबत विचारले. त्यांनी सगळं त्याच सहजतेनं सांगितलं. मी म्हणालो तुम्ही नक्कीच युवकचे प्रदेशाध्यक्ष होणार… !! असं झालं तर पहिली मुलाखत मी तुम्हालाच देणार संजयराव.. असं ते आपसुक म्हणाले… काही दिवसातचं राजीव सातव युवक प्रदेशाध्यक्षपदी अशी बातमी दिल्लीतून आली.. अन त्यांचा समोरून मला फोन आला… संजयराव तुम्हाला मी शब्द दिला होता की पहिली मुलाखत तुम्हालाच देणार… कुठे भेटताय.. मी साम टीव्हीसाठी रिपोर्टिंग करत होतो. 

अशोक सुरवसे सरांना मी विचारले मुलाखत घेवू का .. तर ते म्हणाले थेट आपल्या बेलापूर कार्यालयातील स्टुडिओत येतात का बघ … लाईव्हचं करूया… राजीव सातवजींना मी विचारले अन ते लगेच तयार झाले. मला आठवतयं त्यांनी मला दादरच्या प्लाजा समोर भेटायला या मी पोचतोय असं कळवलं.. तिथून आम्ही सोबतच बेलापुरला गेलो. सुमारे तासाभराच्या त्या प्रवासात आमची खुप चांगली ओळख झाली अन ती पुढे उत्तम मैत्रीत रूपांतरीत झाली. मराठवाड्यातील एक उमदा युवा नेता म्हणून सतत अभिमान वाटायचा. वयाची 35 वर्षे पुर्ण झाल्यानंतर त्यांचा फोन आला. त्यांचे मार्गदर्शक मित्र @सचिन_सावंत यांनी त्यांना सांगितले की राहुलजींना युवक प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्या म्हणून सल्ला दिला. वयाची 35 वर्षे पुर्ण झाल्याने आता त्या पदावर नियमानुसार राहू शकत नाही म्हणून राजीवजीनी राजीनामा पाठवला. पण राहुलजीनी तो स्विकारला नाही. पण त्यातून एका इमानदार काॅग्रेस युवा नेत्याचा गुण राहूल गांधी यांना कळाला. अन त्यांचात मैत्रीचे संबध अधिकच घट्ट झाले.
अत्यंत कमी वयात राजकारणाची उत्तम जाण असणारा हा मराठवाड्यातील हिरा गांधी घराण्याच्या विश्वासाला पात्र ठरला. ते नेहमी म्हणत, संजयराव आपण खुप लहान आहोत. खुप मोठं घराणं नाही. जात नाही. पण इमानदारीनं काम करायचं. गांधी घराण्याच्या कितीही जवळ असलो तरी पक्षनिष्ठा अन वरिष्ठांना डावलण्याची कुरघोडी करायची नाही. पक्षात काम करताना ” आॅफ स्टंपच्या बाहेचा चेंडू आतमधे वळणार नाही याची काळजी घ्यायची” … नाहीतर राजकारणात असा चकवा देणार्याचीच विकेट जाते…


त्यांचा हा स्वभावचं त्यांच्या इमानदारीचं प्रमाण होता. अन त्यामुळेच राजीव सातव यांना खुप लहान वयात मोठ्या जबाबदारी मिळाल्या.
गुजरातच्या निवडणुकीची प्रभारी म्हणून त्यांच्याकडे संपुर्ण जबाबदारी दिली. त्यावेळी मी गुजरात निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो. राजकोट ला आम्ही एकत्र राहिलो. तेंव्हाच ते म्हणाले गुजरात मधे काॅग्रेसला खुप चांगली संधी आहे. सत्ता कदाचित येणार नाही पण आम्ही भाजपच्या जवळपास जावू एवढ्या जागा जिंकू. सौराष्ट्र अन कच्छची त्यांच्याकडे विशेष जबाबदारी होती. त्यांनी तिथं खुप चांगलं यश मिळवून दिले.
मला आठवतयं 2014 ला त्यांना हिंगोलीतून लोकसभा लढवण्याची विनंती राहूल गांधी यांनी केली. तो मतदार संघ राष्ट्रवादी कडे होता. त्यामुळे त्यांनी नकार कळवला होता. पण स्वतः राहूल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली अन हिंगोलीच्या बदल्यात रायगड हा लोकसभा काॅग्रेसनं राष्ट्रवादीला दिला.

हेही वाचा- काँग्रेस खासदार राजीव सातव यांचे निधन

त्यावेळी बॅ.ए.आर.अंतुले जिवंत होते. खुप मोठं बंड होण्याची शक्यता असूनही शरद पवार यांनी रायगड घेतला. कारण एक उमदा तरूण नेता हिंगोलीतून राष्ट्रीय राजकारणात पाऊल टाकणार होता याची पारख शरद पवार यांना होती.
खरतरं राजीव सातव यांचे व्यक्तिमत्वचं अगदी साधं अन सर्वसमावेशक होते. कट्टर काॅग्रेसी विचारांची बांधणी असलेला हा नेता होता. पण काळानं घात केला. भविष्यातला एक उत्तम नेता काळानं हिरावला. अन अगदी उत्तम मित्र पण कोरोनाची लढाई हरला.
राजीवजी तुमचा हा मृत्यू आयुष्यभर हळहळ वाटणारा आहे…
शेवटी भावपुर्ण श्रध्दांजली एवढचं म्हणू शकतो..!!

– संजय मिस्किन, सोशल मीडियावरून साभार

litsbros

Comment here