सोलापूर जिल्हा

‘आय लव बायको’ स्टेट्स ठेवले आणि तिथंच फसला: बालविवाह उघड; आई व मुलगी गायब; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

‘आय लव बायको’ स्टेट्स ठेवले आणि तिथंच फसला: बालविवाह उघड; आई व मुलगी गायब; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

मोहोळ : पेनूर येथील एका ९ वर्षाच्या लहान मुलीबरोबर बालविवाह करून देव कार्यासाठी तीर्थक्षेत्राला गेलेल्या कोन्हेरी येथील त्या नवरदेवासह त्याचे आई-वडील व मुलीच्या आईवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलगी व आई गायब झाले आहे. पोलिस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पेनूर (ता. मोहोळ) येथील एका केवळ नऊ वर्षाच्या मुली बरोबर दिनांक ३० नोव्हेंबर रोजी कोन्हेरी येथील नात्यातीलच अविनाश दाजी शेळके (वय २१) याचा बालविवाह मुलीची आई व मुलाचे आई वडील यांनी संगनमताने केला होता.

दरम्यान हे नवविवाहीत जोडपं देवदर्शनासाठी तीर्थक्षेत्राला गेले होते. त्या ठिकाणचे काही फोटो नवरदेवाने त्याच्या मोबाईलवर ‘आय लव बायको’ असे स्टेटस ठेवले होते. त्या ठेवलेल्या फोटोंचा स्क्रीनशॉट काढत अज्ञात व्यक्तीने सोलापूर येथील महिला व बाल विकास कार्यालयातील चाईल्ड लाईन १०९८ या संपर्क क्रमांकावर फोन करत या बाल विवाहाची माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, सदस्य योगेश स्वामी, दत्तात्रेय शिर्के यांच्या पथकाने मोहोळ पोलिसाशी संपर्क करत त्या ठिकाणाहून पोलिस कर्मचाऱ्यांची मदत घेऊन कोन्हेरी येथे जाऊन चौकशी केली.

हेही वाचा- कारखाना बंद पाडण्यासाठी नाही, तर शेतकऱ्यांचे पैसे थकवणे व रणदिवे यांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मोर्चा; बागलांवर आठ दिवसात कारवाईची तुपकरांची मागणी

पाण्यात ट्रॅक्टर घालून धोकादायक ऊस वाहतूक; पण तो व्हिडीओ..

अविनाश याने त्याच्या नातेवाईकाची नऊ वर्षाच्या मुलीबरोबर विवाह केल्याचे लक्षात आल्यानंतर दाजी भीमराव शेळके, तारामती दाजी शेळके व नवरदेव अविनाश दाजी शेळके व पीडित मुलीची आई यांच्या विरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ चे कलम ९ , १० , ११ , भारतीय दंड विधान कलम ३४ अन्वये अतुल वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या चौघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान मुलीची आई व पीडित मुलगी सध्या बेपत्ता असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोबो चव्हाण करीत आहेत.

litsbros

Comment here