क्राइमसोलापूर जिल्हा

ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार;तर दोघे जखमी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार;तर दोघे जखमी

मोहोळ:मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे एसबीआय बॅकेजवळ येथे मध्यरात्री ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर दोघे जखमी झाले.जखमींना उपचारासाठी पुढे पाठवण्यात आले आहे. यात सुनील वाघमारे (वय ३१ वर्ष रा.टिळक नगर,सोलापूर) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गिरीश माने (वय ३२), हर्षवर्धन सर्वगोड (वय ३५ दोघे रा.गजानन नगर,सोलापूर) हे दोघे जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहीती वरून सविस्तर बातमी अशी की, दि.२० रोजी गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड व सुनील वाघमारे हे वाहन क्रमांक एमएच १३ डिटी १८९१ या चारचाकी वाहनाने सांगोला येथे गेले होते. संगोला येथील काम संपवून ते सांगोला येथून सोलापूरला निघाले होते. दि.२१ च्या मध्यरात्री ०१ वा. यांचे वाहन मंगळवेढा-सोलापूर रोडवरील बेगमपूर येथे एसबीआय बँकेसमोर आले असता समोरून येणारा ट्रक एमच १३ डीक्यू १२७० याने यांच्या वाहनाला समोरून धडक दिली. धडक देऊन वाहन चालक पळून गेला आहे.

हेही वाचा-जेऊर येथील जीनियस अबॅकस सेंटरच्या वतीने होणार गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार; सौ.ज्योतीताई नारायण पाटील राहणार उपस्थित

मनोहर भोसलेला बारामती कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, करमाळा पोलिसांनी घेतलं ताब्यात

या धडकेत सुनील वाघमारे हे मयत झाले असून गिरीश माने, हर्षवर्धन सर्वगोड हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अशा आशयाची फिर्याद कामती पोलिसात हर्षा कुमार कांबळे यांनी दिली आहे. पुढील तपास कामती पोलीस ठाणे करीत आहे.

litsbros

Comment here