करमाळासोलापूर जिल्हा

करमाळा येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर संपन्न

करमाळा (प्रतिनिधी) ; तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 27-12-2022 वार – मंगळवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले.

या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून डॉ. बिपीनजी परदेशीं यांचेसह संतोषजी गानबोटे,भैया राठोड, सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.

यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत 4020 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून आज 81 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 24 रुग्ण ऑपेरेशन साठी पुण्याकडे रवाना झाले.

भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.

या प्रसंगी बोलताना डॉ. बिपीन परदेशीं यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.संतोष गानबोटे यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा – उपळाई बुद्रुक येथील श्री नंदिकेश्वर विद्यालयाचे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश;6 विद्यार्थिनींची पुणे विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

फरश्या उतरवल्या अन् जेवणाचा डबा आणायला निघाला.. पण काळाने घात केला! ट्रक मागे घेताना ट्रक अंगावरून गेल्याने रोशेवाडी येथील एकाचा जागीच मृत्यू

आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी पोपट बरीदे, दिनेश मुथा, गणेश बोरा, विलास डिसले ,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, अभय शिंगावी, प्रीतम राठोड,यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमच्या शेवटी अँड. संकेत खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले.

litsbros

Comment here