करमाळामहाराष्ट्रराजकारण

आ.पडळकर यांचा करमाळा दौरा; नेरले येथे बैठक संपन्न

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.पडळकर यांचा करमाळा दौरा; नेरले येथे बैठक संपन्न

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठकीच्या निमित्ताने नेर्ले ता.करमाळा येथे कोलाटी समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी नेरले गावातील बहुसंख्य नागारिक उपस्थित होते. 

यावेळी बहुजन समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखणे, बहुजन समाजातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे व नवे बहुजन नेतृत्व उभे करणे अशा विविध विषयांवर पडळकर यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा- कोरोनामुळे अनाथ झालेल्या करमाळा तालुक्यातील मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेणार व्याख्याते जगदिश ओहोळ; गरजूंनी संपर्क साधण्याचे आवाहन

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात ‘या’ तारखेपासून सिझेरियन पुन्हा सुरू होणार, ‘या’ क्रमांकावर करा संपर्क

करमाळा तालुक्यातील राजकारणात नेते जनतेला व शेतकऱ्यांना लुटत आहेत, आज जनता शांत आहे पण एक दिवस वादळ येईल अशा शब्दात पडळकर यांनी समाचार घेतला.

यावेळी शिवदास बिडगर, माऊली हळणवर, सुभाष मस्के,शिवाजीराव कांबळे,नागेश वाघमोडे, बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे, बिरा शिंगाडे, भानुदास काळे, शरद काळे, अंकुश काळे, गणेश काळे, जालिंदर काळे, शंकर काळे तसेच सर्व कोलाटी समाज बांधव उपस्थित होते.

litsbros

Comment here