राजकारणसोलापूर जिल्हासोलापूर शहर

आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकणारा तो राष्ट्रवादी प्रेमी तरुण कोण? वाचा सविस्तर

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकणारा तो राष्ट्रवादी प्रेमी तरुण कोण? वाचा सविस्तर

१ जुलै- काल आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड फेकणारा तरुण कोण .? याबद्दल सर्वत्र चर्चा झाली. तेव्हा माहिती घेतल्यावर समजलं, त्या तरुणाचं नाव अमित सुरवसे.!

 अमित एक शरद पवारांवर प्रेम असणारा सामान्य शेतकरी कुटुंबातील साधा कार्यकर्ता आहे. जी गोष्ट नेत्यांच्या पोरांनी , पदाधिकाऱ्यांनी करायला हवी ती कार्यकर्त्याने केलीये याचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच अभिमान आहे आणि अशा गोष्टी फक्त कार्यकर्ताच करू शकतो कोणत्याही नेत्याच्या पोरात ती धमक नाही, असे उद्गार अमित बद्दल एका कार्यकर्त्यांने काढले आहेत. 

त्याच्याकडे कोणतंही पक्षाच पद नाही किंवा न त्याच्या कुटुंबातील कोण राजकारणात आहे. सोलापुरात असणारे कोणतेच पक्षाचे नेते, ना पदाधिकारी याला ओळखतात, न जवळ करतात पण फक्त पक्ष प्रेमापोटी हे पोरग राष्ट्रवादीचा कोणताही नेता सोलापूरमध्ये येउद्या अमित बुलेटला झेंडा लावून सर्वात पुढे असतो.

शरद पवार हे फक्त मराठा समाजाचे नेते आहेत आणि गोपीचंद पडळकर म्हणजे पूर्ण धनगर समाज आहे याला एक छेद देणारी दुसरी महत्वाची गोष्ट अमित स्वतः धनगर समाजातील आहे. 

litsbros

Comment here