आ.संजय मामा, खरंच तुम्ही शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचलून त्यांना ‘मामा’ बनवलय का.? तुम्ही गप्प का.?
करमाळा(प्रतिनिधी); सध्या करमाळयाचे आमदार असणारे माढ्याचे संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना शेतीसाठी खते देतो म्हणून सण 2013 साली शेतकऱ्यांकडून शेतीची कागदपत्रे, दस्तऐवज जमा केले आणि 22 कोटी 11 लाख रुपये कर्ज कोथरूड पुणे येथील पंजाब नॅशनल बँकेतून उचलले आहे, ही शेतकऱ्यांची उघड फसवणूक आहे, असा आरोप काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुराव्यासह केला आहे.
या आरोपांचे रान उठले आहे. करमाळा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने मतदान करून माढ्याचे संजय मामा शिंदे यांना आमदार म्हणून स्वीकारले आहे. आज तालुक्यातील गावागावात ‘खरंच संजय मामांनी शेतकऱ्यांना फसवलं का ?’ अशी चर्चा सुरू आहे. पण स्वतः आमदार संजय मामा शिंदे मात्र या प्रकरणी गप्प आहेत.
करमाळा तालुक्यातील जनतेला त्यांनी वेळीच या विषयाचा खुलासा करणे गरजेचे आहे. जनतेचा प्रतिनिधी म्हणून स्पष्टीकरण देणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.
पण इतके गंभीर आरोप होऊन, सगळीकडे चर्चा सुरू असून आमदार काहीच उत्तर देत नसल्याने ‘हा सर्व प्रकार खरा आहे.’ असे करमाळा तालुक्यातील जनतेने समजावे का.? मग याच प्रायश्चित्त म्हणून आमदार काय करणार ? असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
आज पासून करमाळा आगारातून ‘या’ एसटी बस धावणार; प्रवास करायचा असेल तर नक्की लाभ घ्या
Comment here