धार्मिकमहाराष्ट्रराजकारण

आ.रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज प्रतिमेचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले पूजन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

आ.रोहित पवार यांच्या स्वराज्यध्वज प्रतिमेचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले पूजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्या स्वराज्य ध्वज संकल्पनेला राज्यातील जनतेकडून भरपूर प्रेम व भरभरून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठवड्यात ९ सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या ध्वज प्रवासाचा दुसरा टप्पा काल शनिवारी जालना जिल्ह्यात संपला. या टप्प्यात प्रवासाचा दहावा दिवस संपत असताना ध्वज मोहिमेने जालना जिल्ह्यातील अंबड येथील टेकडीवर असलेल्या मत्स्योदरी मंदिर येथे भेट दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे हे देखील उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या टोपे यांनी यावेळी आमदार रोहित पवार यांच्या या नावीन्यपूर्ण प्रभावी संकल्पनेला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याबद्दल कौतुक केले. अंबडमध्ये मत्स्योदरी मंदिराच्या आवारात झालेल्या स्वागत कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री टोपे यांच्यासह रा.काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी काल ‘स्वराज्य ध्वजा’चे पूजन केले. तसंच या उपक्रमाला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. काल स्वराज्य ध्वज मोहिमेने बुलढाण्याजवळ सिंदखेड राजा आणि परभणी येथेही स्थानिकांची व इतर पदाधिका-यांची भेट घेतली.

शक्ती, निष्ठा, संयम, प्रगती, त्याग, संघर्ष व समतेचे प्रतीक असलेल्या स्वराज्य ध्वजाने राज्यातील अनेक शहरांमध्ये पोहोचून तिथल्या स्थानिकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा वसा घेतलेला आहे. स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच थरांमधून उत्फुल्ल प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सतरा जिल्ह्यांतील हजारो नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून स्फूर्तीमय प्रवासाला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राच्या तेजोमय इतिहासाचा वारसा सांगणा-या स्वराज्य ध्वजाचे राज्यात ठिकठिकाणी जोषपूर्ण प्रतिसादात स्वागत होत आहे. प्रवासातील खराब हवामान, वाहतूकीतील अडचणी इत्यादी अडथळ्यांची पर्वा न करता वाटचाल सुरू ठेवत या ध्वज पूजन मोहिमेने दहाव्या दिवसात पदार्पण केले आहे.

हेही वाचा- अखेर मनोहर भोसले करमाळा पोलिसांच्या ताब्यात; आरोग्य तपासणी करून डांबला तुरुंगात

शिवसेनेचे आ.सावंत यांच्या करमाळा तालुक्यातील भैरवनाथ शुगर्स विरोधात ‘या’ मागण्यांसाठी होणार आंदोलन; मुख्यमंत्र्यांना निवेदन

महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करत स्वराज्य ध्वज एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे अशी माहिती स्वराज्य ध्वजाचे संकल्पनाकार आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचा अभिमानास्पद इतिहास युवावर्गाला प्रेरणा देणारा असून अवघ्या देशवासियांपर्यंत हा इतिहास पोहोचवण्याच्या हेतूने हि स्वराज्य ध्वज यात्रा सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी महाराष्ट्रातील राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे.

या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी राज्यातील ३६ जिल्हे आणि सहा राज्यांसह १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/ या संकेतस्थळावर पाहाता येईल.

litsbros

Comment here