सांस्कृतिकसोलापूर जिल्हा

सोलापुरातील डॉक्टर तरुणीची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

सोलापुरातील डॉक्टर तरुणीची मिस इंडिया स्पर्धेसाठी निवड

सोलापूर : महाराष्ट्राच्या शिरपेचात सोलापुरातील  तरुणीने मानाचा तुरा खोवला आहे. सोलापुरातील तरुणीची मिस इंडिया या सौंदर्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे ही तरुणी डॉक्टर आहे. मिस इंडियासाठी निवड झालेली या तरुणीचं नाव डॉक्टर इशा अभय वैद्य असं आहे. फेब्रुवारीमध्ये पहिल्या टप्प्यात 26 मुलींमधून ती निवडली गेली. त्यानंतर जयपूरमध्ये दुसरी चाचणी पार पडली. या चाचणीतही इशाची निवड झाली.


यानंतर आता तिसरी चाचणी ही राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. या तिसऱ्या चाचणीसाठी इशा सहभागी झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत इशाची निवड झाली, तर तिला इंटरनॅशनल, मिस मल्टिनॅशनल, मिस एशिया पॅसिफिक या स्पर्धांमध्ये तिला संधी मिळणार आहे. त्यामुळे आता इशाच्या कामगिरीकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक होऊ शकते का.? काय आहेत कायदेशीर बाबी.? वाचा प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ यांचं याविषयी मत

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अखेर अटक

litsbros

Comment here