मिरगव्हण येथे पाच जणांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; क्लिक करून वाचा सविस्तर

मिरगव्हण येथे पाच जणांविरोधात विनयभंग आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी; क्लिक करून वाचा सविस्तर

करमाळा (प्रतिनिधी);
मिरगव्हण तालुका करमाळा येथे एका अंगणवाडी सेविकेचा शाळेत जाऊन, घरी व इतर ठिकाणी पाच जणांनी मिळून जातीवाचक शिवीगाळ करून तिच्या मनाला लज्जा वाटेल असा प्रकार केल्याने त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बाळू गोयेकर, राजेंद्र गोयेकर, रवींद्र गोयेकर, बयडाबाई गोयेकर, बापूराव गोयेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत.

याबाबत अंगणवाडी सेविकेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , यातील दोन आरोपींची मुले मार्च मध्ये अंगणवाडीत येत होती . यावेळी शालेय पोषण आहरावरून वाद झाला होता. यावेळी वाद नको म्हणून फिर्यादीने वाद मिटवून घेतला होता.

तरीही 24 जुलै रोजी सकाळी 8 वाजता फिर्यादी महिला या अंगणवाडी शाळेत जात असताना बाळू गोयेकर याने फिर्यादी महिलेचा हात पकडून तु मला आवडतेस.तू ऊसात चल असे सांगून हात ओढला. यावेळेस मी त्याचा हात झटकला. यावेळी तो वस्तीकडे गेला. व त्यांने त्यांच्या भावकीतील आरोपी लोकाला पुन्हा पंधरा मिनिटांनी शाळेत घेऊन आला.

यावेळी वरील आरोपीनी फिर्यादिला शाळेतच शिवीगाळ केली. मनाला लज्जा वाटेल असे वर्तन केले. तू येथे नौकरी कशी करते ते पाहतोच अशी दमदाटी व शिविगाळ केली. अश्लिल शेरेबाजी केली.

तसेच यातील संशयित आरोपी बापुराव याने महिलेच्या घरी रात्री साडेनऊ वाजता येऊन माहितीचा अधिकार टाकला असे सांगून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
त्यामुळे फिर्यादी वरून त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – केम-रोपळे रस्त्यांची दुरावस्था; १५ ऑगस्टपर्यंत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास स्वातंत्र्य दिनी शिवसेना महिला आघाडी करणार आंदोलन

डिकसळ- कोंढार चिंचोली नविन पुलाच्या निविदा प्रस्तावास मंजुरी; आ.संजय मामा शिंदे यांची माहिती; 3 जिल्ह्यांना जोडणारा मार्ग होणार सुकर, वाचा सविस्तर

करमाळा पोलिसांनी वरील संशयित आरोपी पैकी तिघांना अटक केली असुन त्यांच्यावर अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित भगवान पाटील हे करीत आहेत.

karmalamadhanews24: