मेघश्री गुंड हिचे बुद्धीबळ स्पर्धेतील यश कौतुकास्पद व प्रेरणादायी – उपाध्यक्ष सज्जनराव जाधव अंजनगाव खेलोबा व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मेघश्रीचा सत्कार

मेघश्री गुंड हिचे बुद्धीबळ स्पर्धेतील यश कौतुकास्पद व प्रेरणादायी – उपाध्यक्ष सज्जनराव जाधव

अंजनगाव खेलोबा व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने मेघश्रीचा सत्कार

माढा/प्रतिनिधी- ‘जशी खाण तशी माती,शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ या म्हणीप्रमाणेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांच्यातील संस्कार,सद्गुण, सत्संग,शिस्त,चिकाटी,अभ्यासू वृत्ती,आत्मविश्वास व प्रामाणिक प्रयत्न हे आजोबा व वडिलांचे गुण डोळ्यासमोर ठेवून मेघश्री गुंड हिने जे बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून जे उल्लेखनीय यश संपादित केले आहे.ते निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल मेघश्री गुंड हिचा अंजनगाव खेलोबा व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्काराच्या वेळी बोलत होते.

यावेळी बुद्धीबळ स्पर्धेतील यशाबद्दल मेघश्री गुंड हिचा व महाराष्ट्र राज्य कृती समितीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार व माढा प्रेस क्लबच्या नूतन कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सज्जनराव जाधव,सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले व डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अनिलकुमार अनभुले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डीसीसी बँकेचे शाखाधिकारी अनिलकुमार अनभुले यांनी सांगितले की, विठ्ठलवाडी गावाचा नावलौकिक विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर उंचावत आहे ही बाब निश्चितच भूषणावह आहे.प्राथमिक व माध्यमिक शाळेतील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सुज्ञ व जागरूक पालकांच्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उज्ज्वल यश प्राप्त करून उच्च पदाला गवसणी घातली आहे.याकरिता सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड यांच्यासह इतर अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले आहे.

हेही वाचा – प्रा.राहुलकुमार चव्हाण जगदीशब्दाच्या राज्यस्तरीय क्रांतीसुर्य पुरस्काराने सन्मानित.

दिपक ओहोळ यांना क्रांतीसुर्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड, अंजनगाव खेलोबाचे सरपंच प्रतिनिधी प्रदिप चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष विनायक चौगुले,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,ग्रामपंचायत सदस्य बिरुदेव वाघमोडे,वाचनालयाचे सचिव नेताजी उबाळे,शांताबाई गुंड,मेघना गुंड,सत्यवान गुंड, कैलास सस्ते उपस्थित होते.

फोटो ओळी- विठ्ठलवाडी ता.माढा येथे मेघश्री गुंड हिचा सत्कार करताना प्रदिप चौगुले उपाध्यक्ष सज्जनराव जाधव, अनिलकुमार अनभुले,विनायक चौगुले व इतर मान्यवर.

karmalamadhanews24: