मेघश्री गुंड हिचा एटीएस स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक

मेघश्री गुंड हिचा एटीएस स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात तृतीय क्रमांक

माढा / प्रतिनिधी- बार्शी तालुक्यातील वैराग येथील महर्षी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सन 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय एटीएस स्पर्धा परीक्षेत विठ्ठलवाडी ता.माढा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यिनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने 300 पैकी 252 गुण प्राप्त करून सोलापूर जिल्ह्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

या स्पर्धा परीक्षेत 300 पैकी 256 गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.मेघश्री गुंड हीने या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्तेच्या जोरावर विशेष उल्लेखनीय यश संपादित केले आहे.तिला सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,सुधीर गुंड,आई मेघना गुंड, मुख्याध्यापक सुभाष लोखंडे, विजय काळे,भारत कदम, ऐजिनाथ उबाळे,गोरखनाथ शेगर,सुप्रिया ताकभाते,संजय सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.ती विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्रकुमार गुंड सर यांची कन्या आहे.

हेही वाचा – ‘जग बदलणारा बापमाणूस’ मराठी पुस्तकाचे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रकाशन; जगदीश ओहोळ यांच्या ‘जग बदलणारा बापमाणूस’ पुस्तकाची जगभर चर्चा !

लोकसभा आचारसंहितेमुळे जत्रा यात्रातील मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ब्रेक, कलावंतांचे काय ?

या यशाबद्दल तिचे अभिनंदन गटशिक्षणाधिकारी विकास यादव,सरपंच संगीता अनभुले, केंद्रप्रमुख सत्यवान थोरात, मुख्याध्यापक शिवाजी तळेकर, चेअरमन अनिलकुमार अनभुले, डॉ.किशोर गव्हाणे,डॉ.मोहन शेगर,मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे,रघुनाथ पासले, वाचनालयाचे अध्यक्ष रामचंद्र भांगे,सचिव नेताजी उबाळे,सौदागर गव्हाणे,दिनेश गुंड,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश डुचाळ,सतीश गुंड,समाधान कोकाटे,सज्जन मुळे,सौदागर खरात,सागर मोरे,कैलास सस्ते,शिवाजी जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी केले आहे.

फोटो ओळी – मेघश्री गुंड

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
AddThis Website Tools
karmalamadhanews24:
whatsapp
line