माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी

माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी

करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०२३ योजनेतून तूर ,उडीद  व मुग तसेच कांदा  या  पिकांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एक निवेदन पाठवण्यात आले.याबाबत सविस्तर माहिती देताना माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले की पंतप्रधान पिक विमा योजना खरीप २०२३ योजनेतून तूर , उडीद मुग व कांदा या पिकांना विमा कंपनीकडून वगळण्यात आले आहे. माझे करमाळा मतदार संघातील हजारो शेतकऱ्यांनी गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये तूर , उडीद व मुग, कांदा, आदी पिकांची विक्रमी लागवड केली होती. तसेच विमा कंपनीकडे याचा विमा ही उतरविला होता.

परंतु आता विमा कंपनीकडून २५ % अग्रिम नुकसान भरपाई देण्याचे ठरले. यात विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीन या पिकाचा समावेश केला. तूर , उडीद व मुग ही पिके वगळण्यात आली.

करमाळा तालूक्याती ५९५९ शेतकऱ्यांना ८६,२४०००/- एवढीच रक्कम विमा नुकसान भरपाई पोटी मंजूर झालेली आहे. करमाळा तालुक्यामध्ये तूर , उडीद व मुग या पिकांचीच विक्रमी लागवड होते.तरी शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी तूर , उडीद व मुग, कांदा या पिकानाही विमा नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सदर पिक विमा कंपनीला दिले पाहिजेत.

हेही वाचा – आवाटी येथील शेतकऱ्याची कन्या ऐश्वर्या वाघमोडे ही विद्यार्थिनी 99.80% गुण मिळवून करमाळा तसेच परंडा तालुक्यात दहावी मध्ये प्रथम

करमाळा तालुक्यात सर्वदूर चांगला पाऊस; खते बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धडपड !

दि १४ जुन २०२४ रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी सोलापूर जिल्ह्यातील लागवड क्षेत्र, पिके, पिक विमा नुकसान भरपाई रक्कम यांची आकडेवारी प्रसिध्दी माध्यमांना दिली. यात केवळ मका, बाजरी आणि सोयाबीन या तीन पिकांचा उल्लेख असल्याने करमाळा मतदार संघातील शेतकरी संभ्रमावस्थेत आहे.

जर पिक विमा रक्कम भरुनही आपल्या पेर आणि नुकसान झालेल्या पिकास नुकसान भरपाई यादीतून वगळले गेले‌ असल्याचा धसका शेतकऱ्यांना बसला असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी करमाळा मतदार संघातील तपशीलवार माहिती संबंधित विभागाकडून घेऊन‌ शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे.

karmalamadhanews24: