माझ्या यशात श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा सिंहाचा वाटा- सीए आशिष नकाते सी.ए (सनदी लेखापाल) च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या आशिष नकाते यांचा सत्कार

माझ्या यशात श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा सिंहाचा वाटा- सीए आशिष नकाते

सी.ए (सनदी लेखापाल) च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार

माढा प्रतिनिधी
श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक मध्ये उपळाई बुद्रुकचा सुपुत्र तसेच विद्यालयाचा माजी विद्यार्थी आशिष अरविंद नकाते याने सी.ए (सनदी लेखापाल) च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक दशरथ देशमुख साहेब यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे गुरुकुल विभागप्रमुख शब्बीर तांबोळी सर यांनी केले.

सीए (सनदी लेखापाल) च्या अंतिम परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा विद्यालयाच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.उपळाई बुद्रुक गावातून पहिला ‘सीए’ होण्याचा बहुमान त्याने पटकाविला आहे. सत्काराला उत्तर देताना आशिष नकाते म्हणाला,माझ्या यशामध्ये श्री नंदिकेश्वर विद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे तसेच माझ्या माध्यमिक शिक्षणाचा (इ.5 वी ते इ.10 वी) पाया श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक विद्यालयाने भक्कम केला त्यामुळे मी यश संपादन करू शकलो.

हेही वाचा – श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम येथील अनुष्का राजकुमार होरणे या विद्यार्थिनीची उत्तुंग बालवैज्ञानिक स्पर्धेतून निवड;इसरो, आयआयटी, सायन्स सिटी अहमदाबाद पाहण्याची संधी

भरपूर पाऊस पडू दे,शेतकरी सुखी,समाधानी राहू दे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाकडे साकडं! नाशिक जिल्ह्यातील ‘या’ दापत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री नागेश बोबे सर,दैनिक सकाळचे पत्रकार श्री गणेश गुंड सर,विद्यालयाचे माजी विद्यार्थी सुयश नकाते व तनिष्क नकाते यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी आदी उपस्थित होते.श्री शब्बीर तांबोळी सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.

karmalamadhanews24: