धार्मिकमहाराष्ट्र

मराठा आरक्षणाची सुनावणी ‘या’ कालावधीत होणार; संपूर्ण राज्याचे लक्ष

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मराठा आरक्षणाची सुनावणी ‘या’ कालावधीत होणार; संपूर्ण राज्याचे लक्ष

सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची ८ मार्च ते १८ मार्च अशी सुनावणी चालणार आहे.

राज्य सरकारला युक्तिवादासाठी ४दिवसांचा वेळ देण्यात आला आहे, तर विरोधी याचिकाकर्त्यांना ३ दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. केंद्र सरकार सुद्धा याच्यात आपली बाजू मांडणार आहे.

८ मार्चपर्यंत कोर्टामध्ये प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली तर प्रत्यक्ष अथवा व्हर्च्युअल सुनावणी घेण्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.घटनात्मक खंडपीठाकडून मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मार्चपर्यंत प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल अशीही अपेक्षा आहे.

हेही वाचा-‘कृषीपंप विज धोरण 2020’ सवलत योजनेचा करमाळा तालुक्यातील ‘या’ गावातून शुभारंभ; शेतक-यांचा उत्तम प्रतिसाद

महाराष्ट्रातील ४ महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा राष्ट्रीय महिला आयोगाकडून सन्मान; सोलापूरच्या सातपुते यांचा समावेश

८, ९, १० मार्च रोजी मराठा आरक्षणाच्या विरोधातले युक्तिवाद करणार आहेत. तर १२, १५, १६ मार्च रोजी राज्य सरकार युक्तिवाद करणार आहे. तर १८ मार्चला केंद्राच्या वतीने ॲटर्नी जनरल बाजू मांडणार आहेत.

litsbros

Comment here