क्राइमधार्मिकमहाराष्ट्र

ब्रेकिंग न्यूज- परवानगीविना मराठा मोर्चा काढल्याने 3000 जणांवर गुन्हा दाखल

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ब्रेकिंग न्यूज- परवानगीविना मराठा मोर्चा काढल्याने 3000 जणांवर गुन्हा दाखल

बीड; मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा क्रांती संघर्ष मोर्च्याकडून मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी आयोजकांसह 3 हजार लोकांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. यात आमदार विनायक मेटे, नरेंद्र पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 जून रोजी बीडमधील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल याठिकाणी मराठा समाजाने एकत्र येत मोर्चा काढला होता. हा मोर्चा शहरातील प्रमुख रत्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला होता. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला यानंतर मान्यवरांची आक्रमक भाषणे झाली.

निवडक समन्वयकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्या जर मागण्या पाच जुलैपर्यंत मान्य झाला तर सात जूनला अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा देखील संयोजकांनी दिला.

हेही वाचा- ब्रेकिंग; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा, ‘या’ तारखेला पुन्हा होणार ‘मराठा मोर्चा’

वेळेत रुग्णवाहिका व उपचार न मिळाल्याने रुग्णांचे जात आहेत जीव; जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केम गावात आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका आहे धूळ खात पडून; लक्ष कोण देणार का.?

विशेष म्हणजे, या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली तरी, कसल्याही परिस्थिती मोर्चा निघणारचं असं शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी जाहीर केलं होतं.

अखेर, विना परवानगी मोर्चा काढल्याप्रकरणी प्रमुख 21 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.यामध्ये विनायक मेटे यांचा सुद्धा सहभाग आहे. मोर्चात सहभागी झालेल्या इतर अज्ञात अडीच ते तीन हजार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच साथरोग नियंत्रण कायद्या नुसार सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे.

litsbros

Comment here