मराठा आरक्षण प्रश्नी आज मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटणार
कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्या नंतर राज्यात मराठा समाजात नाराजी पसरली असून, आता पुन्हा मराठा समाज आंदोलनाच्या पवित्र्यात दिसत आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिडा सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी भेट घेणार आहेत.
मराठा आरक्षण संदर्भात पंतप्रधान मोदीच्या भेटीच्या या शिष्टमंडळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत उपमुख्यमंत्री अजित पावर, अशोक चव्हाण, छगन भुजबळ व राज्य सचिव सीताराम कुंटे हे देखील असणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदीच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या कार्यक्रमातुन संभाजीराजे यांनी ही 16 जून पासून राज्यात आंदोलनाची सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणा वर लवकर तोडगा निघाला नाहीत राज्यात येत्या काळात मोठी आंदोलने पाहायला मिळू शकतात. हिच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकार कडून हालचाली होताना दिसत आहेत.
मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी यांच्या भेटी दरम्यान केंद्राच्या वतीने मराठा आरक्षण संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता असून आता केंद्राच्या कोर्टात चेंडू ढकलण्याचा राज्याचा प्रयत्न असून, मुख्यमंत्री व पंतप्रधान भेटीतून मराठा आरक्षणा वर काय तोडगा निघणार का हे आता पाहावे लागणार आहे.
Comment here