मराठा आरक्षणासाठी पाठिंबा म्हणून करमाळयात 27 ॲाक्टोंबरपासुन चक्री उपोषण; तहसीलदारांना निवेदन, वाचा सविस्तर
करमाळा (प्रतिनिधी अलीम शेख); मराठा समाजाची परिस्थिती आरक्षण नसल्यामुळे अत्यंत बिकट झाली असून या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण मिळणे .काळाची गरज असून मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 27 ऑक्टोबर रोजीपासुन करमाळा तहसील येथे सकाळी दहा वाजल्यापासून चक्री उपोषण करणार आहोत याबाबतचे निवेदन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामदास झोळ यांनी दिले.
नायब तहसीलदार गायकवाड दादा पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांना देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आपल्या जीवाची बाजी लावून आरक्षणाची लढाई लढत आहेत मराठा समाजाची समाजाची परिस्थिती अत्यंत बिकट असून ठराविक लोक संपन्न असून बाकी इतर समाज मात्र मूलभूत गरजा भागविण्यास सक्षम नाही.आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शैक्षणिक फी भरण्यास पैसा नसल्याने अनेकांना अर्धवट शिक्षण घ्यावे लागत आहे.
व्यवसाय कराव तर भांडवल नाही शेती आहे तर निसर्गाचा लहरीपणाचा फटका बसत असल्याने न घर का ना घाट का अशी मराठा समाजाची परिस्थिती झाली आहे .छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जाती बारा बलुतेदार यांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले सर्वांना आपल्या भूमिकेतून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्यक्षात आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मागास घटकांना विशेष प्राधान्य देऊन बारा बलुते अठरा पगड जातींना प्रथमता आपल्या राज्यामध्ये आरक्षण दिले आशा छत्रपतीच्या वारसदार असणाऱ्या या समाजाची परिस्थिती सध्या हरवलेली असल्याने या समाजाला आरक्षण मिळणे ही खरी काय ही खरी सध्याची गरज आहे.
राजकारणातही मराठा समाजाची मंडळी समाजाची बाजू न घेतल्यामुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे पण आता ही आरपारची लढाई झाली असून कुठल्याही नेत्या पक्षाच्या वरदहस्त शिवाय सर्वसामान्य कुटुंबातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा समाज एकवटला आहे.
त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय हा लढा थांबणार नाही या भूमिकेचे समर्थन म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देत आपण एक दिवशीय चक्री उपोषण करणार असल्याची प्राध्यापक रामदास झोळ सर यांनी सांगितले.
सदर निवेदनावर कामगार नेते दशरथ कांबळे मा.सरपंच विष्णु रंदवे, सुदर्शन शेळके दिनेश मडके, दगडू भोगल प्रीतम सुरवसे गोपीनाथ पाटील अमोल सुरवसे हनुमंत मांढरे पाटील राजकुमार देशमुख, नागेश चव्हाण,दिपक पाटुळे,सुदाम चव्हाण,
नागेश चव्हाण, नरेद्रसिंह ठाकुर,जीवन जाधव,शैलेश गरड,अरुण जगताप,युवराज झोळ,राज झिंजाडे,हरी जगताप,मधुकर काळे ,सिध्दार्थ वाघमारे,अस्लम शेख,सुरेश झांजुर्ण यांच्या सहया आहेत.