करमाळाक्राइम

मनोहर भोसलेला बारामती कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, करमाळा पोलिसांनी घेतलं ताब्यात

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मनोहर भोसलेला बारामती कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी, करमाळा पोलिसांनी घेतलं ताब्यात

बारामती : मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडी संपल्याने त्याला बारामती न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. मनोहरमामाला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती एन. व्ही. रणवीर यांनी आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी ओंकार शिंदे यालाही हजर करण्यात आलं होतं.

करमाळा पोलिसांनी मनोहरमामाला ताब्यात घेतले आहे . तर ओंकार शिंदेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक फसवणूक आणि अघोरी उपचार प्रकरणी ओंकार शिंदे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोहर मामा भोसले याच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.

या प्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

मनोहर मामांनी आरोप फेटाळले

दरम्यान, मनोहर मामा यांनी आटोळे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली होती. मनोहर मामा यांच्यावर गेल्या काही दिवसांत अनेक प्रकारचे आरोप झाले आहेत. मी कुठेही फरार झालो नाही. तिरुपतीला गेलो होतो. माझ्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. माझ्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न आहे. करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझी विनाकारण बदनामी सुरु असल्याचं मनोहर मामा यांनी म्हटलंय.

litsbros

Comment here