करमाळाक्राइमताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

भोंदू मनोहर भोसले प्रकरणावरून करमाळयात रंगले राजकारण; आजी-माजी आमदार समर्थकांचे आरोप प्रत्यारोप; स्वतः आबा-मामा भूमिका मांडणार का ?

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

भोंदू मनोहर भोसले प्रकरणावरून करमाळयात रंगले राजकारण; आजी-माजी आमदार समर्थकांचे आरोप प्रत्यारोप; स्वतः आबा-मामा भूमिका मांडणार का ?

करमाळा(प्रतिनिधी) ; करमाळा तालुका हा नेहमीच नवनव्या कारणांनी राज्यात प्रकाशझोतात असतो. आता मागील काही दिवसांपासून करमाळा तालुका एका भोंदूबाबाच्या दुष्कृत्यांनी राज्यात चर्चेत आला आहे.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव या गावात मठ बांधून बस्तान बसवणारा व स्वतःला संत बाळूमामाचा भक्त सांगून लोकांना लूटमारा बलात्कारी मनोहर भोसले यांच्या कृत्यांनी तालुक्याची मान खाली गेली आहे.

 

पण यातही आपले राजकारण साधणार नाहीत ते पुढारी कसले.? करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील व आजी आमदार संजय मामा शिंदे यांचे कार्यकर्ते सध्या सोशल मीडियावर त्या मनोहर भोसले सोबतचे एकमेकांच्या नेत्यांचे फोटो व्हायरल करून नेत्यावर आरोपप्रत्यारोप करत आहेत.

माजी आमदार नारायण पाटील यांचे भोसलेला उघड समर्थन-

माजी आमदार नारायण पाटील यांनी चार दिवसांपूर्वी माध्यमांना दिलेल्या माहितीत मनोहर भोसले यांचे मला अनेक चांगले अनुभव आले आहेत. मी त्यांना मानतो, असे सांगत उघड समर्थन केले होते. पण त्यानंतर दोनच दिवसानी त्या महाराजांचे बलात्कारासह अनेक कारनामे उघड झाल्याने पाटलांची मोठी पंचाईत झाली आहे.

यावरूनच आ.संजय मामा शिंदे गटाचे कार्यकर्ते पाटील यांच्या या भूमिकेवर बोट ठेवत, टीका करत आहेत.

मग पाटील गटाचे कार्यकर्ते आक्रमक होत, होय आमचा आबांच्या धार्मिक भूमिकेला पाठिंबा आहे. असे म्हणत मुख्य मुद्द्यावर न बोलता धार्मिक स्थळासाठी केलेली कामे सांगत आहेत.

त्याचबरोबर पाटील गटाकडून ही आ. संजय मामा शिंदे ही या मनोहर भोसलेच्या भेटीला जात होते, त्यांचे ही चांगले संबंध होते. शिंदे ही मनोहर भोसलेचे आशिर्वाद घ्यायचे असे सांगत, आ.शिंदे यांचे मनोहर भोसले सोबत असणारे फोटो व्हायरल करत आहेत.

हेही वाचा- करमाळा शहरात नवविवाहित तरुणीची विष पिऊन आत्महत्या

उंदरगावच्या भोंदू मनोहर भोसलेसह साथीदारांवर बलात्कार व गँगरेपचा गुन्हा दाखल; रोज उघड होत आहेत नवनवे गुन्हे

जनतेसाठी नेते या भोंदू विरोधात भूमिका स्पष्ट करणार का.?

“आपला नेता अशा महाराजाला मानतो” हे जनतेसाठी घातक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यातील जनतेसाठी, उद्या त्यांची फसवणूक होऊ नये, अंधश्रद्धा निर्मूलन व्हावे यासाठी करमाळा तालुक्यातील कोणतरी नेता आपली भूमिका उघड करेल का.? ही वाट सध्या तालुक्यातील सुज्ञ नागरिक पाहत आहेत.

तो भोंदू आज उद्या तुरुंगात जाईलच पण आपला नेता कोणाचं समर्थन करतो, त्याचे आदर्श काय आहेत. सध्या तालुक्यातील जनता हे पाहत आहे.

 

litsbros

Comment here