करमाळाक्राइम

दुनिया झुकती है, झुकनेवाला मनोहर भोसले जैसा चाहीये! उंदरगावच्या मामाच्या बेहिशोबी मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दुनिया झुकती है, झुकनेवाला मनोहर भोसले जैसा चाहीये! उंदरगावच्या मामाच्या बेहिशोबी मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी

करमाळा( प्रतिनिधी): दुनिया झुकती है,
झुकानेवाला चाहिये! या प्रमाणेच करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे संत बाळुमामा यांचा भक्त असल्याची बतावणी करून अनेक लोकांना अंधश्रद्धेच्या खाईत लोटणा-या आणी त्यांची लाखों रूपयांची फसवणूक करून आपला उदरनिर्वाह चालवणा-या स्वयंघोषित, सद्गुरू मनोहर भोसले उर्फ मनोहर मामा याच्या बेहिशोबी मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीम आर्मीचे महाराष्ट्र राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसार प्रसिद्धी माध्यमातून केली आहे.

कांबळे म्हणाले की मनोहर भोसले याच्याकडे अलिशान चार चाकी गाड्या त्याबरोबर त्याची पत्नी रूपाली भोसले यांच्या नावे करमाळा तालुक्यातील घोटी याठिकाणी तब्बल 27 एकर शेतजमीन आहे.

उंदरगाव येथे आश्रम असुन तिथून दर अमावस्येला अघोरी प्रथा केली जाते. कोणाच्या अंगातील भुतबाधा,आजार पण,सुख शांती याकरिता होमहवन करतात याने अध्यात्माचा बाजारच मांडला असुन मनोहरचे वडील हे सुध्दा भक्तांना हातात भंडा-यात बुडवून गंडादोरा बांधताना देखील 100 रूपये घेतात.

मनोहर भोसले हा मुळचा इंदापूर तालुक्यातील लासुर्णे या गावचा असुन तो काही वर्षांपासून उंदरगाव येथे वास्तव्यास आहे.

अघोरी विद्या शिकून आल्यावर लोकांना गंडवण्याची कामे करू लागला त्यातूनच त्याने अमाप माया गोळा केला आहे.अनेक राजकीय पक्षातील मोठमोठे पुढारी देखील मनोहर भोसले कडे आपले राजकीय भविष्य पाहण्यासाठी जातात.

तो स्वःला वारकरी संप्रदायातील सांगतो तर पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाला की मी ज्योतिषशास्त्रात पदवी घेतली आहे.
वारकरी संप्रदाय आणी ज्योतिषशास्त्र यात जमिन आसमानाचा फरक आहे.

कारण वारकरी संप्रदायात अंधश्रद्धेला थारा नाही आणी ज्योतिषशास्त्र अंधश्रद्धेला पोषक आहे त्यामुळे मनोहर भोसले ने याचे स्पष्टीकरण द्यावे असे कांबळे म्हणाले .

litsbros

Comment here