मणिपूर घटना मानवतेला आणि देशाला काळीमा फासणारी: उत्तरेश्वर कांबळे

मणिपूर घटना मानवतेला आणि देशाला काळीमा फासणारी: उत्तरेश्वर कांबळे

जेऊर प्रतिनिधी: गेल्या दोन अडीच महिन्यापासून मणिपुर मध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार सुरू आहे.
त्यात आजतागायत 160 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला असून राज्यात आणि देशात दलित, मुस्लिम, आदिवासी ,ख्रिश्चन आदी समाजातील स्त्रियांवरील अत्याचारात प्रामुख्याने वाढ झालेली आहे.

मणिपूर मध्ये हिंसाचारात कुकी आदिवासी समाजातील स्त्रियांची नग्र धिंड काढण्यात आली त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला ही संतापजनक घटना मानवतेला आणि देशाला काळीमा फासणारी असुन त्यातील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली पाहिजे अशी प्रतिक्रिया भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.


पुढे बोलताना कांबळे म्हणाले की बेटी बचाव बेटी पढाव चा धारा देणारे आता कुठे लपवून बसले आहेत या घटनेवर बोलण्यासाठी त्यांना वेळ नाही का? ही घटना कळायला तब्बल 77 दिवसांचा कालावधी लागला सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने ही घटना जगासमोर आली.
देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदुत्वादी संघटनांचे लोक अराजकता पसरवण्याचे काम करत आहेत हे देशासाठी अंत्यत घातक आहे यांना वेळीच आवर घातला पाहिजे.

हेही वाचा – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जनशक्तीचे अतुल खूपसे पाटील यांचा एकाच गाडीतून प्रवास; जयंत पाटील म्हणाले..

करमाळा तालुक्यातील ‘या’ 2 गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह या 5 उपकेंद्रांच्या पद निर्मितीला मान्यता; आ.संजयमामा शिंदे यांची माहिती

यापुर्वी महाराष्ट्रातील खैरलांजी येथे सन 2006 ला अशी घटना घडली होती त्यातील नराधम आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी देशभरातून झाली होती परंतू तत्कालिन शासनाने याकडे दुर्लक्ष केले होते असा आरोप देखील उत्तरेश्वर कांबळे यांनी केला आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line