मानेगाव येथे आ.बबनराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांचा स्नेह मेळावा
महिला स्वयंसहायता समूहाच्या वतीने बुधवारी 18 जानेवारी रोजी दुपारी आयोजन
माढा / प्रतिनिधी –माढा तालुक्यातील मानेगाव येथे महिला स्वयंसहायता समूह व बचत गटाच्या माध्यमातून बुधवारी 18 जानेवारी रोजी दुपारी 3.30 वाजता येथील संत सावता माळी मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती बचत गटाच्या संचालिका तथा सामाजिक कार्यकर्त्या आयोजक प्रमोदिनी सुहास लांडगे यांनी दिली आहे.
मानेगाव परिसरातील 45 बचत गटाच्या प्रकल्प संचालिका या नात्याने प्रमोदिनी लांडगे यांनी महिलांसाठी मागील अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवले असून ग्रामीण भागातील महिलांना सक्षम व स्वावलंबी बनवण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध पदार्थ व वस्तूंची निर्मिती करून त्यास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न पाठपुरावा केला आहे.
बचत गटातील महिलांना छोटे-छोटे व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या व बँकांच्या माध्यमातून अर्थपुरवठा केला आहे.यावेळी बचत गटातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व कौतुक करण्याच्या उद्देशाने हा स्नेह मेळावा आयोजित केला असून परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
विठ्ठलवाडीतील मेघश्री गुंड हिचा बुद्धिबळ स्पर्धेतील यशाबद्दल सत्कार
याप्रसंगी नगराध्यक्षा मीनलताई साठे,गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा,गोविंद पाटील,अवधूत देशमुख,कृषी अधिकारी बी.डी.कदम, डॉ.विकास मस्के,मंडल कृषी अधिकारी हनुमंत बोराटे,विजय जाधव,विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक निळकंठ पाटील,सरपंच तानाजी लांडगे,कृषी सहाय्यक अनिल देशमुख,ग्रामसेवक सुभाष गळगुंडे, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक राजेश कुमार यांच्यासह बचत गटाच्या सदस्या उपस्थित राहणार आहेत.
Comment here