आरोग्यदेश/विदेश

तिसऱ्यांदा सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर केली ‘ही’ मोठी घोषणा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

तिसऱ्यांदा सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी विजयानंतर केली ‘ही’ मोठी घोषणा

विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय व तिसऱ्यांदा पश्चिम बंगालची सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज(सोमवार)एक घोषणा केली. या पुढे आता पश्चिम बंगालमधील सगळे पत्रकार देखील करोना योद्धे असणार आहेत.

”मी सर्व पत्रकारांना कोविड योद्धा असं घोषित करते.” असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला.

अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली.

हेही वाचा- कोरोनामुळे नववधूवरांच्या हातावर मेहंदी ऐवेजी सॅनिटायझर लावण्याची वेळ; कोरोनाच्या धास्तीने अनेक लग्न सोहळे रद्द

करमाळयात समता परिषदेतर्फे भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा निषेध

litsbros

Comment here