मकाईच्या निवडणुकीत पुरावा म्हणून खोटी कागदपत्रे सादर, प्रा. झोळ यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार; राजकीय आखाड्यात खळबळ

मकाईच्या निवडणुकीत पुरावा म्हणून खोटी कागदपत्रे सादर, प्रा. झोळ यांची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार; राजकीय आखाड्यात खळबळ

करमाळा (प्रतिनिधी); मकाई साखर कारखाना निवडणुकीमध्ये पुरावा म्हणुन खोटी बनावट कागदपत्रे सादर केल्याबाबत प्रा.रामदास झोळ यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे.

जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मकाई सह. सा. कारखाना निवडणुकीसाठी सभासद या नात्याने अर्ज भरला असुन दि. १९ रोजीच्या छाननीत थकबाकी असल्याचे बनावट कागदपत्रे सादर करुन नामनिर्दशन अर्जांवर हरकती घेण्यात आल्या. हरकतदारांनी घेतलेल्या हरकतींमध्ये संबधीत उमेदवार अथवा त्यांचे सुचक, अनुमोदक यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या लेटरपॅडवर मकाई कारखान्याचा शिक्का असलेले बेबाकी दाखले दिसून आले.

प्रत्यक्षात आदीनाथ सह. सा. कारखाना आणि मकाई सह. सा. कारखाना या दोन्ही संस्थांचा एकमेकांशी संबध नाही. असे असताना सदरचे दाखले हे संबधित हरकतदारांनी खोटे व बनावट तयार करुन ते निवडणुक प्रकियेतील छाननी कामी पुरावा म्हणुन वापरले आहेत. उपरोक्त विषयान्वये सदर बाब गंभीर असुन फौजदारी गुन्हयाच्या अखरात्यातील आहे.

हेही वाचा – केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक विद्यालयात गुरुजन कृतज्ञता आणि माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

बहुजनांच्या विकासासाठी छत्रपती शाहू महाराजांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रप्रमुख रोहिदास कापसे श्री संत गाडगेबाबा विद्यालयात छत्रपती शाहू महाराजांचा स्मृतिदिन साजरा

याबाबत लक्ष देऊन २२ मे रोजी असणाऱ्या सुनावणीपुर्वी या प्रकरणाची शहानिशा करुन जिल्हाधिकारी यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी प्रा.रामदास झोळ यांनी केली आहे.

karmalamadhanews24: