माजी आमदार पुत्राच्या घरातच नळाला गटारीचे पाणी करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार मुख्याधिकारी लोंढे यांचे याकडे दुर्लक्ष

माजी आमदार पुत्राच्या घरातच नळाला गटारीचे पाणी

करमाळा नगरपालिकेचा भोंगळ कारभार

मुख्याधिकारी लोंढे यांचे याकडे दुर्लक्ष

करमाळा प्रतिनिधी – करमाळा शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या नळाला आज गटारीचे पाणी मिश्रित होऊन फंड गल्ली सुतार गल्ली येथील जनतेला पिण्यासाठी सोडण्यात आले.

या भागात राहणारे करमाळ्याची माजी आमदार कैलासवासी अण्णासाहेब तथा पांडुरंग जगताप यांचे चिरंजीव बाळासाहेब जगताप यांच्या घरातील पिण्याच्या पाण्याच्या नळाला आज सकाळी गटारीतले पाणी पुरवठा करण्यात आले.त्यांच्यासह फंड गल्ली सुतार गल्ली येथील सर्व नागरिकांना आज गटारीचे पाणी पिण्याची वेळ आली.

करमाळ्याचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे सातत्याने दीर्घकालीन रजेवर जात असल्यामुळे करमाळ्यातील स्वच्छता व पाणीपुरवठा योजनेचा बोज बारा झाला आहे.करमाळा शहरातील पाणीपुरवठा योजनेतील खालील पाईपलाईन गटारीला चिटकून आहेत

वारंवार सातत्याने गटारी चे पाणी पिण्याच्या पाईपलाईन मध्ये घुसत असल्यामुळे नागरिकांना गटारीचे पाणी प्यावे लागत आहे याबाबत नगरपालिकेत तक्रार करण्यास गेले असता कोणत्याही कर्मचारी समाधानकारक उत्तर देत नाहीत
दूषित पाण्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढले असून विशेषतः लहान मुले अनेक रुग्णालयात दाखल झालेली आहेत.

हेही वाचा – ३७ वर्षांनी भरला पुन्हा दहावीचा वर्ग विद्यार्थ्यानी दिला जुन्या आठवणींना उजाळा महात्मा गांधी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

करमाळा तालुक्यातील उजनी प्रकल्पातील पुनर्वसित 30 गावांच्या समस्या बाबत बैठकीचे आयोजन; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती

याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष द्यावे व करमाळा शहराचे नियोजनाचे काम मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना करता येत नसेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा देऊन करमाळा सोडून जावे अशी मागणी बाळासाहेब जगताप यांनी केली आहे.

याबाबत आम्ही वारंवार नगरपालिकेत तक्रारी केल्या तरी आमची कोणीही दखल घेत नाही सध्या नगरपालिकेत प्रशासक असल्यामुळे अधिकारी हम करे सो कायदा याप्रमाणे वागत आहेत.
आज आलेले गटारीचे पाणी बाटलीत भरून नगरपालिकेत घेऊन देण्यासाठी गेलो असता तेथे कोणी उपस्थित नव्हते.
उद्या करमाळातील सर्व पत्रकारांना घेऊन घेऊन दूषित पाणी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांना सप्रेम भेट देणार असल्याचे सांगितले.

karmalamadhanews24: