महाराष्ट्रमाणुसकीशैक्षणिक

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे शिंदे कुटुंबीयांना मदतनिधी सुपूर्द

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघातर्फे शिंदे कुटुंबीयांना मदतनिधी सुपूर्द

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्यावतीने निमगाव खलु येथील गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांना तेहतीस हजार सहाशे त्रेपन्न (३३६५३/- )रूपयांची मदत करण्यात आली . दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ अजिंक्य येळे यांच्या हस्ते शिंदे कुटुंबीयांना मदतीचा धनादेश देण्यात आला .

३१ मार्च २०२२ रोजी झालेल्या अपघातात गणेश शिंदे यांच्या कुटुंबातील इयत्ता नववीत शिकणारी मुलगी व इयत्ता सातवीत शिकणारा मुलगा ह्या दोन्हीं बहीणभावाचे अपघाती निधन झाले .यामुळे गणेश शिंदे यांच्या कुटुंबीयांवर खूप मोठा आघात झाला.

त्यांची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची आहे . त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याचे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या माध्यमातून राज्याध्यक्ष गौतम कांबळे व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांच्या उपस्थितीत मदतीचा धनादेश देण्यात आला .

हेही वाचा – करमाळ्यात महाराष्ट्र दिना निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम, गौरव महाराष्ट्राचा यासह अनेक कार्यक्रम संपन्न; वाचा सविस्तर

केम येथील तरुणाचा भोसकून खून, या प्रकरणात दोन महिलांचा ही समावेश, पाच जनांविरोधात गुन्हा दाखल, तिघांना अटक तर दोन फरार; वाचा सविस्तर..

यावेळी राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे , शिक्षक महासंघाचे समाजकल्याण विशेष शिक्षक प्रतिनिधी अंकुश चव्हाण, गणेश शिंदे,आश्विन वाघमारे, मच्छिंद्र निगडे, सतिश शिंदे,अशोक भोसले, रामदास जाधव , बालाजी अडसुळे इ.पदाधिकारीउपस्थित होते . महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या अवाहनाला शिक्षक बंधू भगिनींनी प्रतिसाद दिल्याबद्दल राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळींबे यांनी सर्वांचे आभार मानले .

litsbros

Comment here