..आणि अजित पवारांचा फोटो पक्ष कार्यालयातुन हटवला; वाचा सविस्तर
(प्रतिनिधी); राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजप सेना सरकारमध्ये सहभागी होत एकप्रकारे बंड पुकारले आहे. तर शरद पवार यांनी मात्र भाजप विरोधी भूमिका घेत, या सहभागाला विरोध दर्शविला आहे. याचे पडसाद आता राज्यात उमटण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शरद पवारांना पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांचा फोटो तुमच्या पाठीमागे आहे हे लक्षात आणून देताच अजित पवारांचा फोटो पक्ष कार्यालयातून हटवण्यात आलं.
आता या प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यात कोण अजित पवार यांच्या सोबत जाते आणि कोण शरद पवार यांच्या सोबत राहते हा ऑस्टुक्याचा विषय झाला आहे. करमाळा माढा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनी अजित पवार यांच्या सोबत जाणे पसंत केले आहे. आता करमाळयात ही या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत काय घडामोडी घडतात याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.