पालकमंत्री पुन्हा बदलले, पुण्याला अजित दादा तर सोलापूरला चंद्रकांत दादा ; क्लिक करून वाचा सविस्तर

पालकमंत्री पुन्हा बदलले, पुण्याला अजित दादा तर सोलापूरला चंद्रकांत दादा ; क्लिक करून वाचा सविस्तर 

महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून काही ना काही कारणानं सरकारमध्ये कुरबुर सुरु असल्याचं दिसून येत आहे. महायुतीचं सरकार येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटत नव्हता अखेर अजित पवारांच्या (Ajit Pawar) नाराजीनंतर तिढा सुटला. राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्हा पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे- पाटील याना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आलं आहे .

सुधारित 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे

पुणे- अजित पवार

अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

भंडारा- विजयकुमार गावित

बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील

कोल्हापूर- हसन मुश्रीफ

गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

बीड- धनंजय मुंडे

परभणी- संजय बनसोडे

नंदूरबार- अनिल भा. पाटील

वर्धा – सुधीर मुनगंटीवार

अजित पवारांच्या राजकारणाचे पॉवर सेंटर पुणे

अजित पवार आपल्या मित्रपक्षांवर दबाव टाकून आपल्याला हवे ते करण्यात पटाईत आहेत. 15 वर्षे काँग्रेसने राष्ट्रवादीच्या या दडपशाहीचा किंवा दबाव राजकरणाचा अनुभव घेतला आता तोच अनुभव भाजपला येत आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाले खरे पण त्यांचे मुख्य लक्ष्य हे पुण्याच्या पालकमंत्री पदावर होते. अजित पवारांच्या राजकारणाचे पॉवर सेंटर पुणे आहे. आपल्या होमपीचवरील आपला वचप कायम राहावा यासाठी अजित पवार आग्रही होते. मात्र आता भाजपसमोर पुण्यात आपला पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

karmalamadhanews24: