मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

मोठी बातमी ! मनसेचा ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार?

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेली आघाडी, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून भाजपशी केलेली हातमिळवणी, वंचित बहुजन आघाडीने ठाकरे गटाशी केलेली युती आणि आता अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडून युतीत केलेला प्रवेश यामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलं आहे. राज्यात नवीन राजकीय समीकरणे निर्माण झालेली असतानाच दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून हालचाली सुरू झाल्या आहेत. या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावेत म्हणून मुंबई आणि ठाण्यात बॅनर्स लागले आहेत. ही बॅनरबाजी सुरू असतानाच आता एक मोठी बातमी आली आहे.

मनसेकडून उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट भाजपसोबत गेल्यामुळे मनसेकडून हा प्रस्ताव दिला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. राज ठाकरे यांचे अत्यंत जवळचे मनसे नेते अभिजीत पानसे यांनी आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली.

दैनिक सामनाच्या कार्यालयात जाऊन अभिजीत पानसे यांनी राऊत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊत यांना युतीचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जात आहे. राजकीय वर्तुळातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली असून राज्यात आणखी नवीन राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

FacebookFacebookTwitterTwitterLinkedinLinkedinWhatsappWhatsappFacebook MessengerFacebook Messenger
karmalamadhanews24:
whatsapp
line