आरोग्यकरमाळामहाराष्ट्रमुंबईराज्यसोलापूर जिल्हा

राज्यात ३० एप्रिल पर्यंत आठवड्यातील ‘हे’ दोन दिवस असणार कडकडीत लॉकडाऊन; इतर दिवस ‘हे’ कडक निर्बंध

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

राज्यात ३० एप्रिल पर्यंत आठवड्यातील ‘हे’ दोन दिवस असणार कडकडीत लॉकडाऊन; इतर दिवस ‘हे’ कडक निर्बंध

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आता मंत्री मंडळाने लॉकडाऊन संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली.

राज्यात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी संपले. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. तसेच लॉकडाऊनची नियमावली उद्या रात्री ८ वाजता जारी करण्यात येणार असल्याचंही मलिक यांनी सांगितले आहे.

लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.

litsbros

Comment here