महाराष्ट्रराजकारण

मोठी बातमी: विधानसभेत धक्काबुक्की करणारे भाजपचे ‘हे’ 12 आमदार निलंबित

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

मोठी बातमी: विधानसभेत धक्काबुक्की करणारे भाजपचे ‘हे’ 12 आमदार निलंबित

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. यावेळी धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या 12 आमरादांना निलंबित करण्यात आले असून हे निलंबन एक वर्षासाठी आहे. त्यामुळे विरोधकांना ही धक्काबुक्की भोवल्याचे दिसून येत आहे. या करावाईनंतर विरोधी पक्षांनी कामकाजावर बहिष्कार घातला आहे.

ओबीसींचं आरक्षण रद्द झाल्यानंतर इंपेरिकल डाटा केंद्र सरकारने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावा, असा ठराव ठाकरे सरकारने विधानसभेत मांडला आहे. याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनात येऊन जोरदार घोषणाबाजी केली. तसेच अध्यक्षांचा माईकही ओढला. यावेळी सभागृहात धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. या प्रकारावर सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून गोंधळी 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली आहे.

याप्रकरणी विरोधी पक्षातील काही आमदारांचं निलंबन होण्याची शक्यता आहे. सरकार 12 आमदारांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, संजय कुटे, पराग अळवणी, नारायण कुचे, गिरीश महाजन, जयकुमार रावल, राम सातपुते, हरिष पिंपळे, बंटी बागडीया, योगेश सागर या बारा आमदारांची नावे पुढे आली आहेत. 
दरम्यान, विधानसभेतील गोंधळानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी निवदेन दिले.

सभागृहातील ही घटना काळीमा फासणारी आहे. राज्याच्या इतिहासात असे कधी झाले नाही. सभागृहातील वर्तन हे लांछनासपद आहे. काही आमदारांनी माईक ओढण्याचा प्रयत्न केला. तर काही आमदारांनी राजदंड ओढण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधी घडलेले नाही, असे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात निवदेन करताना सांगितले.

तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्षांना धक्काबुक्की झालेली नाही. मात्र, त्याचवेळी आमच्या काही लोकांचे शब्द चांगले नव्हते. हे मी मान्य करतो. पण त्याचवेळी आम्ही तुमची माफी मागितली. मोठ्या मनाने विरोधकांना बोलवा आणि चर्चा करा. चर्चा न करता कारवाई करु नका, असे फडवणवीस म्हणाले.

litsbros

Comment here