धार्मिकमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ‘या’ तारखेपासून उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

महाराष्ट्रातील सर्व मंदिरे ‘या’ तारखेपासून उघडणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका अद्याप दूर असल्याचा अंदाज आल्याने महाराष्ट्र सरकारने आज दोन महत्वाचे निर्णय घेतले. राज्यातील शाळा सुरू करण्यासोबतच नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.

गेली दीड वर्षे राज्यातील मंदिरे बंद होती, पालखी सोहळा व इतर धार्मिक उत्सव यावरही बंदी होती. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने या विरोधात आघाडी उघडली होती. मात्र सरकारने त्यास फार थारा दिला नाही. आता संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचे लक्षात आल्यानंतर मंदिरांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा- UPSC परीक्षेत इतिहास, सोलापूरचा डंका; बार्शीचा अजिंक्य दुसऱ्यांदा UPSC उत्तीर्ण; का दिली दोनदा परीक्षा ? वाचा अजिंक्यचा प्रेरणादायी प्रवास

करमाळा तालुक्यात आज शुक्रवारी वाढले कोरोनाचे नवे १६ रुग्ण; वाचा गावनिहाय रुग्णसंख्या

४ ऑक्टोबर पासून राज्यातील शाळा सुरु होणार: वर्षा गायकवाड –

यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, याची जाणीव मुख्यमंत्र्यांनी करून दिली आहे.

litsbros

Comment here