महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

महाफीड कंपनीकडून संगम शाळेस रंगरंगोटी व बोलक्या भिंती करण्यासाठी मदतनिधी

माळशिरस प्रतिनिधी – महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया (प्रा.लि. पुणे) कंपनीचे संचालक  प्रवीण पाटील साहेब यांच्या सौजन्याने जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा संगम शाळेच्या इमारतीस रंगरंगोटी करणे व शालेय भिंती शैक्षणिक चित्रासह बोलक्या करणे यासाठी विशेष निधी देण्यात आला होता.

संगम शाळेतील सात वर्गखोल्यांचे आतून भिंतींना वॉल पुट्टी भरून रंगकाम, बोलक्या भिंती, शैक्षणिक तक्ते, बाहेरील बाजूने संपूर्ण इमारतीला रंगकाम करून बोलक्या भिंती करणे, शाळेचे नाव टाकणे इत्यादी बाबींसाठी महाफीड स्पेशालिटी फर्टीलायझर्स इंडिया या कंपनीतर्फे निधी देण्यात आला. सदर मदतनिधी शाळेचे शिक्षक  दत्तात्रय कदम सर यांच्या प्रयत्नातून मिळाला.


सदर देणगीबद्दल महाफीड कंपनीचे आभार व्यक्त करण्यासाठी प्रतिनिधींचा सन्मान सोहळा शाळेच्या वतीने संपन्न झाला. सदर सोहळ्यासाठी महाफीड कंपनीचे मॅनेजर आप्पासाहेब चव्हाण व त्यांचे सहकारी बजरंग तांबारे, सुरज देशमुख, ओंकार देवकर, संगम गावचे सरपंच नारायण ताटे देशमुख, उपसरपंच  कुंडलिक ताटे देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण ताटे व सर्व शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. शाळेच्या वतीने शाळेचे मुख्याध्यापक  भोसले सर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ, गुलाबपुष्प व मानाचा फेटा बांधून यथोचित सन्मान करण्यात आला. कंपनीचे मॅनेजर आप्पासाहेब चव्हाण यांनी महाफीड कंपनीच्या योजनांबाबत ओघवत्या भाषेमध्ये आपले विचार व्यक्त केले.

हेही वाचा – मातृ शक्तीचा सन्मान करणे कर्तृत्वाची भरारी घेण्यास प्रेरणादायी – नारी शक्ती गौरव पुरस्कार प्रदान सोहळयात प्रा. करे-पाटील यांचे प्रतिपादन

श्री नंदिकेश्वर विद्यालयामध्ये गुणवंत खेळाडू व क्रीडाशिक्षक यांचा सत्कार समारंभ संपन्न

कंपनीने समाजोपयोगी व शैक्षणिक कामासाठी दिलेले योगदान याबाबत सविस्तर माहिती सांगितली. कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन दत्तात्रय धोकटे सर व संगीता देशमुख मॅडम यांनी उत्तम केले.कार्यक्रमाच्या शेवटी विजय हेगडे सर यांनी कंपनीचे संचालक  प्रवीण पाटील साहेब व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

karmalamadhanews24: