माढा सोलापूर जिल्हा

माढेश्वरी बँकेला पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान 100 ते 250 कोटींच्या दरम्यान ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल झाला सन्मान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढेश्वरी बँकेला पद्मभूषण कै.वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान

100 ते 250 कोटींच्या दरम्यान ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल झाला सन्मान

माढा/प्रतिनिधी- माढा येथील माढेश्वरी अर्बन डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँकेने बँकेचे चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सन 2024-25 या आर्थिक वर्षांत सलग चौथ्या वर्षी एनपीए शून्य (‘0’) टक्के राखण्यात यश मिळविले आहे. मागील आर्थिक वर्षात 100 ते 250 कोटींच्या दरम्यान ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स् असोसिएशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने पुणे विभागातून दिला जाणारा सन 2023-24 चा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते माढेश्वरी बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक लुणावत व पंचायत समितीचे माजी सभापती तथा बँकेचे संचालक विक्रमसिंह शिंदे यांनी बुधवारी 23 जुलै रोजी मुंबई येथे स्वीकारला.

सध्या माढेश्वरी बँकेच्या माढा येथील मुख्य शाखेसह सोलापूर व पुणे जिल्ह्यात एकूण 9 शाखांमधून सभासदांच्या विश्वासास पात्र राहून अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने व पारदर्शकपणे कामकाज सुरू आहे.बँकेचे सध्या 10704 सभासद असून 217 कोटींच्या ठेवी आहेत. बँकेने एकत्रितपणे 333 कोटींची आर्थिक उलाढाल केली आहे.मागील 24 वर्षापासून बँकेला सातत्याने ऑडिट वर्ग ‘अ’ मिळालेला आहे.विशेष म्हणजे बँकेकडून दरवर्षी सभासदांना लाभांशाचे वाटप केले जाते. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणे सभासद व ग्राहकांना सर्व बँकिंग सेवा तत्परतेने पुरविल्या जातात. बँकेने वेळोवेळी आर्थिक कामकाजाबरोबरच इतर विधायक कार्यातून सामाजिक बांधिलकी जपली आहे.या बाबींची दखल घेऊनच समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

हेही वाचा – जिल्हा दूध संघावर केलेले सर्व आरोप चुकीचे व राजकीय हेतूने प्रेरित- चेअरमन रणजितसिंह शिंदे दूध संघाचा तोटा पूर्वीच्या संचालक मंडळाच्या कालावधीतील असल्याचा खुलासा

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न;नाशिक जिल्ह्यातील ‘ या ‘ दांपत्याला मिळाला शासकीय पूजेचा मान

यावेळी माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत,माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, संचालक प्रा.डॉ.गोरख देशमुख गणेश काशीद,ॲड.नानासाहेब शेंडे,राजेंद्र पाटील,दिगंबर माळी,अमित पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे,सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर,भाऊ कड,विजय घोणसे,प्रंचित पोरेड्डीवार, सिद्धेश्वर नवले,पप्पूराजे आतकरे यांच्यासह राज्यातील अनेक बँकांचे अध्यक्ष,
उपाध्यक्ष, संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.

फोटो ओळी – मुंबई येथे सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार स्वीकारताना माढेश्वरी बँकेचे व्हा.चेअरमन अशोक लुणावत, संचालक विक्रमसिंह शिंदे, डॉ.गोरख देशमुख,गणेश काशीद व इतर मान्यवर.

litsbros

About the author

karmalamadhanews24

Mgid Advertisement

Ad 400×432

Similar News

Advertisment Area 1

Advertisment Area 2

Facebook Page

error: Content is protected !!