माढा तालुक्यात आज शनिवारी ४० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, १२ बालकांचा समावेश तर एकाचा मृत्यू
कुर्डूवाडीत ‘या’ तारखांना होणार लसीकरण
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि ५ जून रोजी ९०८ तपासणीत ४० व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून यात १२ बालकांचा समावेश आहे तर ७१ रुग्ण बरे होवून घरी परतले.
शिंगेवाडी येथील एकाचा मृत्यू झाला आहे. चिंचगाव १ ,तांदूळवाडी २ ,वाकव ३, उपळाई खु २ ,उपळाई.बु.३, तडवळे २, भेंड ५, वेणेगाव१ ,परिते १ , माळेगाव १ , अकोले बु.१,पिंपळखुंटे ५, कुर्डू ९,
टेंभूर्णी २, खैरेवाडी १ ,मुंगशी १ अशा १६ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या ची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत कोरोनासंक्रमित व्यक्ती अढळल्या नसल्याची माहिती न.पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली
तर कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात १८ ते ४४ वयो गटातील व्यक्तीना कोव्हक्सीन चा दुसरा डोस दि ८ ते ११ या तारखेला देण्यात येत असून
गत महिन्यात याच तारखेला लस देण्यात आली होती त्याच क्रमवार तारखे प्रमाणे लस मिळणार आहे एकूण ७२३ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात येणार आहे. सदर लस घेताना रजिस्ट्रेशन केलेला मोबाईल घेवून जाणे जरुरी आहे. या नंबरवर रेफरन्स कोड आलेला आहे अथवा लसीकरण प्रमाणपत्र घेवून जाणे गरजेचे आहे अशी माहिती डॉ.प्रसन्न शहा यांनी दिली आहे.
Comment here