माढा तालुक्यातील ‘या’ गावातील युवक वर्ग जपतोय सामाजिक बांधिलकी;राबवत आहेत रक्तदानाचा उपक्रम
माढा प्रतिनिधि:आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने समाजासाठी प्रत्येकाने काहीतरी केले पाहिजे याच उद्देशाने माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील युवक वर्ग गेल्या अनेक वर्षापासून राबवत आहेत पवित्र रक्तदानाचे उपक्रम राबवत आहेत.
गेल्या वर्षीपासून करोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे.त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येते.हीच रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी हा युवक वर्ग गेल्या अनेक दिवसापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करत आला आहेत.
कोरोना काळात अनेक डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी तसेच पोलिस हे कोरोना योद्धे आपली ड्युटी बजावत असतात,मग युवकांनी काहीतरी केले पाहिजे या हेतूने या गावातील युवकांनी एकत्र येऊन रक्तदानाचा उपक्रम राबवला आणि गेल्या अनेक आतापासून हे पवित्र पवित्र रक्तदानाचे उपक्रम राबवण्याचे कार्य हे तरूण करतात.
ज्या दिवशी रक्तदान शिबीर असेल त्याच्या अगोदर रक्तदान शिबिराची माहिती ग्रामस्थांना दिली जातील सोशल मीडिया तसेच वैयक्तिक कॉल करून रक्तदान शिबीर आयोजित केले आहे असे सांगितले जाते त्यामुळे युवक वर्ग रक्तदान शिबिर यासाठी स्वतःहून हजर राहतो.
दिलासादायक बातमी; भारत सरकार म्हणते ‘या’ वयाच्या बालकांना मास्क लावायची गरज नाही; गाईडलाईन्स जारी
अंजनगावातील युवा ग्रुप च्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते सोलापुरातील अक्षय ब्लड बँक या ब्लड बँकेचे या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभत आहे.यावेळी रक्तदात्यांसाठी चहा व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती.आज या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला.
Comment here