कुर्डुवाडीमाढासोलापूर जिल्हा

उपळवटे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक गुरुप्रसाद पाटोळे यांची बदली, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

उपळवटे जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक गुरुप्रसाद पाटोळे यांची बदली, विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी

उपळवटे(प्रतिनिधी) ; माढा तालुक्यातील उपळवटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक गुरुप्रसाद पाटोळे सर यांची बदली झाल्यानंतर त्यांना उपळवटे शाळेतून विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी जड अंतःकरनाणे निरोप दिला. भावपुर्ण वातावरणात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळवटे येथे आदर्श शिक्षक म्हणून गुरुप्रसाद पाटोळे सरांची ओळख गावांमध्ये होती. आज त्यांना निरोप देण्यासाठी उपळवटे गावातील नागरिकांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गर्दी केली होती. पाटोळे सरांना हि मराठी शाळा सोडून जाताना अतिशय वाईट वाटत होते.

ह्या उपळवटे गावातील शाळेला निरोप देताना पाटोळे सरांच्या डोळ्यात पाणी आले होते तर पाटोळे सर आम्हाला सोडून जात आहेत म्हणून विद्यार्थ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. पाटोळे सरांनी उपळवटे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आपुलकीची प्रेमाची वागणूक दिली आहे आमच्या मुलांना आई वडिलांचं प्रेम पाटोळे सरांनी दिले असल्यामुळे पाटोळे सर शाळा सोडून जाताना गावकऱ्यांच्या हि डोळ्यातून पाणी येते होते.

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्य प्रियंका संदीप घोरपडे यांचे चिरंजीव समर्थ संदिप घोरपडे यांनी सर तुम्ही परत आमच्या शाळेला या आशा रडक्या आवाजात पाटोळे सरांना निरोप दिला समर्थ घोरपडे ह्या लहान विद्यार्थ्यांचे हे बोलणे ऐकून पाटोळे सरांनी आश्रुला वाट करून दिली. खुप अभ्यास कर मोठो हो अशी कौतुकाची थाप पाटोळे सरांनी समर्थ घोरपडे यांना दिली.

यावेळी उपस्थित उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील उपसरपंच दीपिका महेश देवडकर सर्व ग्रा.पं सदस्य शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामदास सपाटे उपाध्यक्ष महेश देवडकर शिक्षण प्रेमी अशोक गरड पाटील दिपक भैरवनाथ खूपसे पाटील प्रियंका संदीप घोरपडे भाग्यश्री अर्जुन जाधव,

लक्ष्मण धर्मा जाधव शंकर नवनाथ खुपसे सुप्रिया दत्तात्रेय खूपसे पाटील सुनील भगवान गवळी कविता हुसेन गायकवाड वर्षाराणी प्रकाश खुपसे पाटील सुनिता संतोष जाधव अंजना प्रताप लोंढे रुक्मिणी तानाजी गायकवाड शिक्षक प्रतिनिधी हरिदास विठ्ठल मोळीक विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ सतीश शिरसकर विद्यार्थी प्रतिनिधी अक्षरा निलेश सपाटे सचिव अजिनाथ पांडुरंग शिंदे , 

उपळवटे जि.प प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आजिनाथ शिंदे सर प्रकाश पांडुरंग भवर हरिदास विठ्ठल मोळीक अरविंद विठ्ठल सुरवसे मंदाताई अंकुश खोसे मॅडम ज्योतीराम बिभिषण तळेकर अंगणवाडी सेविका अंजना लोंढे मॅडम सुनंदा मुरूमकर देवयानी कदम अंगणवाडी मदतनीस शोभा ढगे मॅडम उपळवटे गावचे युवा नेते हनुमंत चव्हाण अदी मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here