कुर्डुवाडीमाढा

माढा तालुक्यातील उपळवटे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तालुक्यातील उपळवटे येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी

उपळवटे (प्रतिनिधी-संदीप घोरपडे) ; माढा तालुक्यातील उपळवटे येथे 131 वी भीम जयंती उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली असून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची उपळवटे गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी बोलताना गाडे म्हणाले की, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महु या गावात झाला आहे 1907 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्ही तुन अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.

दलित कुटुंबात जन्मले असल्या कारणाने त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत अर्थशास्त्र प्राध्यापक आणि वकील होते पुढे ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले दलितांना त्यांचे हक्क मिळावेत म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला 1956 मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

भारतासाठी त्यांनी केलेल्या महान कार्यांना कधीही विसरता येणार नाही. उत्कृष्ट सुत्रसंचलन केल्या बद्दल बादलेवाडी गावचे लोकप्रिय निवेदक विलासराव दोलतडे यांचा सन्मान निळसागर ग्रुप उपळवटे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उपस्थित अध्यक्ष दत्तात्रय प्रभू गाडे उपाध्यक्ष भीमराव विलास गायकवाड, सचिव वैभव आनंद खंडागळे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक लक्ष्मण आबा खूपसे पाटील विठ्ठल कार्पोरेशन संचालक उद्धव दादा माळी उपळवटे गावचे सरपंच बालाजी गरड पाटील उपसरपंच दिपीका महेश देवडकर

शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण प्रेमी अशोक कल्याण गरड पाटील ग्रामपंचायत सदस्य दिलीप दादा खूपसे पाटील राहुल घाडगे महेश गोसावी धनंजय शेळके भैय्या घाडगे रामभाऊ ढवळे विराज खुपसे पाटील अधिकराव भिसे व सर्व निळसागर अदी मान्यवर उपस्थित होते.

litsbros

Comment here