कुर्डुवाडीमाढासोलापूर जिल्हा

ढवळस येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

ढवळस येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा(प्रतिनिधी) ; ढवळस ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिवराज्य अभिषेक दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच तुकाराम शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजे यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी संजय गरड, दादासाहेब गव्हाणे, कुबेर अनभुले,दादासाहेब पाटील,तुकाराम शिंदे, व समस्त ग्रामस्थ ढवळस जाधव भाऊसाहेब, संतोष काळे आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते होते. यावेळी सरपंच तुकाराम शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

बारा बलुतेदाराना एकत्र करून गनिमीकाव्याने लढा देऊन शत्रूना जेरीस आणणारा छत्रपती शिवाजी महाराजा सारखा दुसरा राजा झाला नाही.छत्रपती शिवाजी महाराज यांचा कारभार “जाणता राजा” म्हणून ओळखला जातो. प्रत्येकाना न्याय देऊन सन्मानाने जगण्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिकवण होती.

सध्या या पारदर्शक व अनुकरणीय कारभाराची गरज सर्वांनाच आहे.त्याचे अनुकरण प्रत्येक राज्यकर्त्यांनी करावे असे आवाहन सरपंच तुकाराम शिंदे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. यावेळी सर्वांचे आभार धनाजी दोलतोडे यांनी मानले.

litsbros

Comment here