माढासोलापूर जिल्हा

माढा तहसील समोर स्वातंत्र्यदिनी होणार हलगीनाद आंदोलन

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा तहसील समोर स्वातंत्र्यदिनी होणार हलगीनाद आंदोलन

माढा प्रतिनिधी :माढा तालुका प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने माढा तालुक्यातील सर्व तलाठी बांधव आणि मंडळ अधिकारी हे त्यांच्या दिलेल्या सजात राहणे बंधनकारक असून देखील ते त्या सजा त राहत नसले कारणाने सर्व सामान्य शेतकरी आणि सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे सर्व माढा तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या सजा चे गावी मुक्कामास राहावे तसेच जे तलाठी आणि मंडळ अधिकारी आपल्या सोयीनुसार दुसरीकडे राहत होते त्या सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे मागील 3 वर्षाचे घर भाडे वसूल करून शासनाकडे जमा करावे.

तसेच 85 नुसार कौटुंबिक वाटप बाबत दिलेल्या निवेदनाची ही कुठलीही कार्यवाही न केल्याने येत्या 15 ऑगस्ट रोजी आपल्या माढा तहसील कार्यालयासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात येईल.

हेही वाचा – डॉक्टर करमाळयात नसल्याचा फायदा घेत, जागा लुबाडण्याचा प्रयत्न; कोर्टाने जामीन फेटाळला

पारेवाडी रेल्वे गेटला तात्काळ पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरज, यासह विविध प्रश्नांवर केत्तुर येथील बैठकीत चर्चा व पुढील लढ्याची आखणी

यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, तालुका अध्यक्ष अमोल केसरे, तालुका संपर्क प्रमुख तांदुळवाडी गावचे उपसरपंच राजेंद्र शिंदे, तालुका उपाध्यक्ष तानाजी मोटे, भास्कर कदम, चेअरमन विलास कदम, बिरुदेव शेळके, संतोष कोळी, पांडुरंग आरे, संजय भुसारे,महेश भुसारे, निखिल भुसारे, सोमेश्वर राऊत खंडेराव भोगे, शिवम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

litsbros

Comment here