माढा तहसील कार्यालयासमोर रिपाई आठवले गटाच्या वतीने ‘या’ मागण्यांसाठी आंदोलन
भोसरे(प्रतिनिधी) ; रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने आंदोलन करण्यात आले. केद़ीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका ठिकाणी ऐकाच वेळेस आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्ह्याचे नेते राजाभाऊ सरवदे साहेब राज्य सरचिटणीस याच्या नेतृत्वाखाली माढा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने माढा तहसीलदार काय॔लयवर निवेदन मागणी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा. महीला वरील होणारे अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी योग्य भुमिका घ्यावी.
आगामी महानगरपालिका, नगरपालिका नगर पचायत निवडणूक मध्ये प्रभाग पद्धत रद्द करावी आणि वॅड पद्धती करावी. ओबीसी समजाला व मराठा समाजाला आरक्षण जाहीर करण्यात यावे. अट्रोसिटी कायद्याची कडक अमलबजावणी करावी. ह्या मागण्या करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – दलित कुटुंबाला घरात घुसून मारहाण; चार आरोपीवर अँट्रोसिटीनुसार गुन्हा झाला
सख्खा भाऊच झाला पक्का वैरी; झोपलेल्या भावाची पंख्याच्या पात्याने गळा चिरून हत्या
प्रमुख मान्य वर सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, अमर लंकेशवर, जिल्हा कोषाध्यक्ष युवा आघाडी, परमेश्वर खरात सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष. बिभीषण कांबळे माढा तालुका अध्यक्ष युवक आघाडी. दादा साहेब बनसोडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष.
यावेळी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comment here