रोपळे (क) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे भूमिपूजन संपन्न; श्रीमंत कोकाटे यांची उपस्थिती व मार्गदर्शन
केम(प्रतिनिधी) ; रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. आपल्या राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या समोर शिवरायांचा पुतळा उभारावा म्हणजे शिवाजी महाराज प्रमाणे लोककल्याणकारी निस्वार्थी निपक्षपाती राज्यकारभार करण्याची सतत प्रेरणा मिळत राहील असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी रोपळे (क)ता. माढा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
प्रारंभी प.पूज्य शिवचरणानंद सरस्वती महाराज चिंचगाव टेकडी व जयंतगिरी महाराज केम यांच्या शुभहस्ते टिकाव टाकून भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत रोपळे क व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती रोपळे यांच्या वतीने मान्यवरांचे शाल श्रीफळ व मानाचा फेटा देऊन सत्कार करण्यात आला.
मा सरपंच तात्यासाहेब गोडगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिव शाहीर विशाल इंदलकर व सहकारी, शिवव्याख्याते केतन वासकर केम, अध्यक्ष अतुल दास उपाध्यक्ष धनंजय पाटील मा उपसरपंच शरद पाटील कैलास मेहेर श्रीपाद दळवे रंगनाथ काळे,जगदीशराजे निंबाळकर,
अर्जुन जाधव, जावेद मुलाणी सुधीर गोडगे,डॉ महेश चव्हाण, प्रभाकर मेहेर, तानाजी दास, अण्णासाहेब पवार,हरिश्चंद्र दास, ह भ प राजेंद्र दास महाराज, शफिक बागवान,मिनाज बागवान गोविंद पाटील, नंदकुमार कुलकर्णी हे उपस्थित होते.
भूमिपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आयोजित केली होते. 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अभिमान फंड यांनी केले व आभार महेश मेहेर यांनी केले.
Comment here