माढ्याचे राजकुमार माने करताहेत दहा वर्षापासून गौरीच्या मुखवट्यांना मोफत रंगकाम
उपळवटे(प्रतिनिधी संदीप घोरपडे) ; माढा तालुक्यातील माढा शहरातील पेंटर राजकुमार माने हे गेली दहा वर्षापासून गौरीच्या मुखवट्यांना मोफत रंगकाम करून देत आहेत त्यामुळे माढा शहरातील नागरिकांचे गौरीचे मुखवटे खराब झालेले कलर गेलेले मुखवटे गौरी गणपतीच्या सणाच्या अगोदर एक महिनाभर माने यांच्याकडे गौरीच्या मुखवट्यांना कलर देण्यासाठी गर्दी होत असताना बघायला मिळत आहे.
त्यामुळे राजकुमार माने यांचे तालुक्यामधून कौतुक देखील होत आहे माढ्यातील एक गृहस्थ मुखवटे रंगवण्यासाठी माने यांच्या दुकानांमध्ये गेले असता त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांनी माने पेंटर यांना विचारले की पैसे नाहीत आणि मुखवटे तर रंगवायचे आहेत.
त्या व्यक्तीचे बोलणे ऐकून गरीबीची जाणीव त्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये राजकुमार माने यांना दिसली तेव्हापासून राजकुमार माने यांनी ठरवले की येथून पुढे गौरीच्या मुखवट्यांचे रंगकाम मोफत करून द्यायचे गौरीच्या मुखवट्यांना रंगकाम मोफत करून देण्याचा हा वेगळाच आनंद मिळत असल्याचेही माने यांनी सांगितले.
त्यांची परंपरा गेली दहा वर्षापासून सुरू आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या उपक्रमासाठी जास्त प्रतिसाद मिळत असल्याचे राजकुमार माने यांनी सांगितले आहे.
Comment here