माढाशैक्षणिकसोलापूर जिल्हा

माढा येथील मुलींच्या शाळेत किशोरी मेळावा उत्साहात साजरा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

माढा येथील मुलींच्या शाळेत किशोरी मेळावा उत्साहात साजरा

माढा प्रतिनिधी:
जि. प. प्रा. मुलींची केंद्रशाळा माढा शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त किशोरी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्या बोळे यांनी स्वागत गीत सादर केले.
सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मुलींच्या शाळेतील सर्व मुलींना माढ्याचे उद्योजक, नगरसेवक अजिनाथ आप्पा राऊत यांचे वतीने २५ डझन वह्यांचे वाटप उपस्थित नगरसेविकांचे हस्ते करण्यात आले.

शाळेच्या वतीने नगराध्यक्षा म्हणून मिनलताई साठे यांचा तसेच उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे, नगरसेवक अजिनाथ आप्पा राऊत, नगरसेविका सुनीता राऊत, गीतांजली देशमुख, वंदना लंकेश्वर, रेश्मा लंकेश्वर, शबाना बागवान, निर्मला थोरात इ. उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.

केंद्रप्रमुख सुरेश माळी यांनी प्रास्ताविक केले. शाळेतील मुलींनी भाषणे केली. यावेळी नगराध्यक्षा मिनलताई साठे यांच्यासह नगरसेविका गीतांजली देशमुख, उपनगराध्यक्षा कल्पनाताई जगदाळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत यश मिळविलेल्या मुलींचे अभिनंदन केले. सर्व महिला, मुलींना सायंकाळी 7 ते 9 या वेळेत T.V. व मोबाईल बंद ठेवण्याचे आवाहन केले.


हेही वाचा – अखेर केमकरांच्या संघर्षाला न्याय मिळाला; लाखोंची तिकिटे, आंदोलने, पाठपुरावा यानंतर महत्त्वाच्या ‘या’ दोन एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना केम स्थानकावर थांबा मिळाला

शेटफळ येथील कष्टकरी युवकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या गावगुंडाना अटक करण्याची परीट समाजाची मागणी

यावेळी वरील सर्व मान्यवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन साठे, सदस्य भैय्यासाहेब खरात, सायली कदम, माढा प्रेस क्लबचे सचिव शेखर म्हेत्रे, भोंग सर,सर्व शिक्षिका व इतर महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन स्वाती घावटे,आभार नीता गिरी यांनी मानले.

litsbros

Comment here