माढा तालुक्यात आज रविवारी कोरोना पॉझिटिव्ह संख्येत घसरण;२९ पॉझिटिव्ह तर एकाचा मृत्यू: वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि २३ मे रोजी ३१० तपासणीत २९ व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या असून १२७ रुग्ण बरे होवून घरी परतले तर होळे येथे एकाचा मृत्यू झाला आहे कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संख्या घसरत असून सलग दहाव्या दिवशी संक्रमित रुग्णा पेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आली आहे.
कुर्डूवाडी ७ , भोसरे ३ ,रोपळे क १ ,अकुलगाव १ ,अंजनगाव खे १ ,उपळाई खु.२ ,उपळाई बु. १, वडशिंगे १ ,अरण ३, मोडनिंब १ ,वरवडे १ ,मिटकलवाडी १ ,उपळवटे १ , कुर्डू २ ,चांदज २ ,माढा १ अशा १६ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्या अशी माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.
कुर्डुवाडीत न.पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या तपासणीत शहरातील ७ व ग्रामीण ७ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या शहरातील जिजामाता नगर, भूषण लॉज जवळ, खरात वस्ती ,देवकते वस्ती या भागात संक्रमित व्यक्ती आढळल्या ची माहिती न.पा आरोग्य निरक्षक तुकराम पायगण यांनी दिली मास्क वापर सुरक्षित रहा.
Comment here