माढा तालुक्यात आज १९९ कोरोना पॉझिटिव्ह तर दोन जणांचा मृत्यू;वाचा- गावनिहाय रूग्णसंख्या
कुर्डूवाडी/प्रतिनिधी ( राहुल धोका )
माढा तालुक्यात दि १ मे रोजी ७११ अँटीजन तपासणीत १९९ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या असून १६६ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत तर दहिवली व टाकळ टे येथील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.
कुर्डूवाडी ७ कव्हे ६ , गवळेवाडी १ , लव्हे २ , बिटरगाव ४ , नाडी १ , भोसरे २ , घाटणे २ , रिधोरे २ , मानेगाव २ , केवड १ , खैरव २ , दारफळ १ , निमगाव मा. ४ , महातपूर ५ ,उपळई बु ८ , वडाचीवाडी तम ८ , रोपळे खु १ , उपळाई खु ४ , सापटणे भो १ , खैरेवाडी १ , वडशिंगे १ , तडवळे १ , मोडनिंब ४ , बैरागवाडी २ , जाधववाडी मो ४ , तुळशी ७ , अरण ४ , बावी १० , परिते ६ , घोटी ४ , वेणेगाव ३, अकोले बु २ , चव्हाणवाडी टे ६ , वरवडे २ , अकुभे ८ , भोईजे १ , पिंपळनेर ३ , निमगाव टे २ , सापटणे टे २ , उपळवटे २ , पिंपळखुंटे २ , अंबाड २ , शेडशिंगे २ , चौभेपिंपरी २ ,टेंभूर्णी ३५ , अकोले खु २ , फुटजळगाव १ , दहिवली १ , माळेगाव २ , कन्हेरगाव २ , शेवरे १ , आढेगाव १ , नगोर्ली १ , गार अकोले १ , शिरळ टे २ , माढा २ अशा ५७ गावातून व्यक्ती कोरोना संक्रमित आढळल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी संतोष पोतदार यांनी दिली.
हेही वाचा-उजनीवर प्रस्तावित उपसा सिंचन योजने बाबत माजी आमदार नारायण पाटील यांनी मांडली ‘ही’ भूमिका
कुर्डुवाडीत न .पा व ग्रामीण रुग्णालय यांच्या माध्यमातून घेतलेल्या तपासणीत शहरातील ७ तर ग्रामीण ४ व्यक्ती कोरोना संक्रमित अढळल्या पटेल चौक, फिल्टर पंप, गीताबाई मळा , जैन मंदिर जवळ , सातव कॉलनी , बँक ऑफ महराष्ट्र या ठिकाणी संक्रमित व्यक्ती असल्याची माहिती न. पा आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी दिली मास्क वापरा सुरक्षित रहा.
Comment here