केमसोलापूर जिल्हा

लॉकडाऊनमुळे धंदा उद्ध्वस्त; चप्पल कारागिरांना सरकारी मदतीची गरज; केम येथील व्यावसायिक फोडत आहेत चिंचा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

लॉकडाऊनमुळे धंदा उद्ध्वस्त; चप्पल कारागिरांना सरकारी मदतीची गरज; केम येथील व्यावसायिक फोडत आहेत चिंचा

केम(प्रतिनिधी); केम तालुका करमाळा येधील चप्पल व्यवसाय करणाऱ्या छोट्या कारागिरावर लाँकडाऊन मुळे चिंचा फडायची वेळ आली आहे, तरी शासनाने बांधकाम कारागिर रिक्षावाले याना पंधराशे रूपये आर्थिक मदत केली आहे. त्या प्रमाणे आम्हा कारागिराना पण मदत मिळावी असी मागणी गणपत कांबळे या कारागीरानी केली आहे.

सध्या दोन महिने झाले लाँकडाऊन मुळे आमचे धंदे बंद झाले आहेत. आमचे हातावचे पोट आहे. काम केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही पुर्वजनापासून हा व्यवसाय सुरू आहे त्यामुळे आम्हाला शेतात काम करायची माहिती नाहि त्यामुळे आम्ही चिंचा फोडायचे काम घरी बसल्या करतो. या चिंचा आम्हाला घरपोहच करतात सतरा रू किलोदराने आम्हाला चिंचा फोडायला दर मिळतो आमच्या घरी मोठे कुटूंब असल्यामुळे आम्ही हाधंदा करतो.

माझी मुले बायका व मी स्वतः चिंचा घरी बसून फोडतो माझा सारखे ईतर कारागीर शंभूनगरात हा व्यसाय करतात त्यामुळे दिवसात वीस तेपंचवीस किलो चिंचा आम्ही फोडतो त्य पैसावर आमचा ऊदरनिर्वाह चालू आहे.

केम येथे चिंचेचा धंदा मोठया प्रमाणात वर चालतो त्यामुळे गोगरीबाना घर बसला रोजगार मिळतो केम येथे चिंचेचा व्यवसाय करणारे वीस ते पंचवीस व्यापारी आहेत हे व्यपारी शेतकऱ्यांचकडून चिंचेची झाडे घेतात व ती मजुराकडून झाडून घेतात.

हेही वाचा-उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.! सद्यस्थितीचे वर्णन करणारा वास्तववादी लेख

करमाळा तालुक्यात रुग्णसंख्या जास्त असलेल्या 60 गावात नेमले ‘तालुकास्तरीय अधिकारी’ गटविकास अधिकारी (BDO) यांनी काढले तातडीचे आदेश; वाचा सविस्तर

चिंचा झाडणाया मजुराना पाचसे रूपये हाजरी आहे व्यापारी लोक आमच्या वस्तीत चिंचा फोडायला घरपोहच करतात व संध्याकाळी माफ करून आमचा रोजगार देऊन नेतात यामुळे आमचा ऊदरनिर्वाह चालत आहे, नाही तर आमच्यावर ऊपासमारीची वेळ आली असते असे कांबळे यानी सांगितले तरी शासनाने आम्हा कारागिराना ईतरा प्रमाणे मदत करावी असी मागणी त्यानी केली आहे.

litsbros

Comment here